AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान नाही ‘या’ सुपरस्टारसोबत बच्चन कुटुंबाचा ३६ चा आकडा, नाही पाहत एकमेकांचं तोंड

Bachchan Family: 'या' सुपरस्टारसोबत बच्चन कुटुंबाचा ३६ चा आकडा, ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन यांना वाटू लागलेली भीती, अभिनेत्याचं आज तोंडही पाहत नाही बच्चन कुटुंब

सलमान खान नाही 'या' सुपरस्टारसोबत बच्चन कुटुंबाचा ३६ चा आकडा, नाही पाहत एकमेकांचं तोंड
फाईल फोटो
| Updated on: May 13, 2025 | 10:40 AM
Share

Bachchan Family: महानायक अमिताभ बच्चन यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. बच्चन कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास चाहते कायम उत्सुक असतात. सध्या बच्चन कुटुंबाच्या शत्रूची चर्चा रंगली आहे. अनेकांना वाटत असेल की, अभिनेता सलमान खान बच्चन कुटुंबाचा मोठा शत्रू असेल. पण असं नाही. सलमान खान नाही तर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यासोबत बच्चन कुटुंबियांचा ३६ चा आकडा आहे. अभिनेत्यासोबत अमिताभ बच्चन यांनी फक्त एकच सिनेमा केला, त्यानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत.

सांगायचं झालं तर, अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने देखील अभिनेत्यासोबत एकाच सिनेमात काम केलं. त्यानंतर दोघे कधीच एकत्र मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत. पण अमिताभ बच्चन यांनी या सुपरस्टारच्या वडिलांसोबत एक सिनेमा केला होता. जो हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात हीट सिनेमा ठरला. सलमान खानने बिग बींसोबत बागबान आणि गॉड तुस्सी ग्रेट हो सारख्या सिनेमात काम केलं आणि ऐश्वर्यासोबत सलमानने हम दिल दे चुके सनम सिनेमात काम केलं

कोण आहे ‘तो’ सुपरस्टार…

सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, ‘तारा सिंग’ सनी देओल आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंसानियत’ अमिताभ बच्चन आणि सनी देओल यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. ‘इंसानियत’ सिनेमा दोघांचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला.

रिपोर्टनुसार, तेव्हा चाहत्यांमध्ये सनी देओल यांची क्रेझ वाढत होती. ज्यामुळे आपलं करीयर धोक्यात येणार अशी भीती अमिताभ बच्चन यांना होती. अशात ‘इंसानियत’ सिनेमातील स्वतःची भूमिका अमिताभ बच्चन यांनी वाढवून घेतला आणि सनी देओल यांना बाजूला केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. असं असताना देखील सनी यांनी शांत राहत बिग बी आणि त्यांच्या कुटुंबापासून स्वतःला लांब केलं.

बिग बी यांच्यासोबत वाद सुरु असताना सनी यांनी तीन वर्षांनंतर ऐश्वर्या सोबत ‘इंडियन’ सिनेमातून स्क्रिन शेअर केली. पण सिनेमा कधी प्रदर्शित झालाच नाही. त्यामुळे सनी आणि ऐश्वर्या यांचं नात्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाला. सिनेमातील गाणी देखील शूट झाले होते. पण ऐश्वर्याने सनी याच्यासोबत काम करण्यास नकार दिला. त्यानंतर दोघे कोणत्यात सिनेमात एकत्र दिसले नाहीत.

सांगायचं झालं तर, जेपी दत्ता यांनी ‘बॉर्डर’ सिनेमात सनी देओल यांना कास्ट केलं, पण जेव्हा त्यांनी ‘एलओसी कारगिल’ सिनेमा बनवला तेव्हा त्यांनी सनीऐवजी अभिषेक बच्चनला कास्ट केले, ज्यामुळे सनी आणि जेपी दत्ता यांच्यात बराच काळ मतभेद होते. पण आता जेपी दत्ता यांनी बॉर्डर 2 मध्ये सनी देओलला कास्ट केले आहे.

Follow Us
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया