Shah Rukh Khan | किंग खान याने साऊथच्या अभिनेत्याकडे केली थेट ही मागणी, मला फक्त एकदा…

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील ट्रेलरने मोठा धमाका केला असून शाहरुखचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

Shah Rukh Khan | किंग खान याने साऊथच्या अभिनेत्याकडे केली थेट ही मागणी, मला फक्त एकदा...
| Updated on: Jan 10, 2023 | 9:02 PM

मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या चाहत्यांसाठी 10 जानेवारीचा आजचा दिवस खास ठरला आहे. कारण आज पठाण या चित्रपटाचे ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आले. पठाण चित्रपटामधील दोन गाणे आणि टीझर यापूर्वीच रिलीज करण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान याचे चाहते ट्रेलरची (Trailer) आतुरतेने वाट पाहात होते. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील ट्रेलरने मोठा धमाका केला असून शाहरुखचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. पठाण चित्रपटामधील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू होता. बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने अनेकांनी आक्षेप घेतला.

साऊथच्या अभिनेत्यांनी देखील पठाण चित्रपटासाठी शाहरुख खान याचे काैतुक केले आहे. आता शाहरुख खान याने चक्क आरआरआर चित्रपटातील अभिनेता राम चरण याला एक विनंती करून टाकली आहे.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचे तमिल आणि तेलुगूमधील ट्रेलर थलपती विजय आणि राम चरण यांनी सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर शाहरुख खान याने धन्यवाद बोलत एक मोठी विनंती केली.

धन्यवाद माझा मेगा पॉवर स्टार राम चरण…RRR ची टीम नक्कीच भारतामध्ये ऑस्कर घेऊन येईल. प्लीज माझी एक विनंती पूर्ण करा…मला स्पर्श करू द्या, लव्ह यू…आता हिच शाहरुख खान याची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

शाहरुख खान याने थलपती विजयसाठी एक ट्विटही केले, ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘धन्यवाद माझा मित्र विजय…पठाण चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यापासून शाहरुख खान हा चर्चेत आहे.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.