भांगडा गीत गाणारा समूह पाहिला आणि ‘ये देश है वीर जवानोंका’ची कल्पना सुचली! वाचा मनोरंजक किस्सा…

| Updated on: Aug 15, 2021 | 9:20 AM

आपल्या हातातल्या छोट्याशा फोनची कळ दाबताच हवं ते संगीत ऐकण्या-पाहण्याची सोय आज तंत्रज्ञानानं उपलब्ध करून दिली आहे. परंतु, एकेकाळी फक्त पडद्यावरचे चित्रपट आणि रेडिओवरून वाजणारी गाणी यातून भारतीय प्रादेशिकतेचे रंग त्याचं वैविध्य याचं मोठ्या प्रमाणात आदानप्रदान झालं.

भांगडा गीत गाणारा समूह पाहिला आणि ‘ये देश है वीर जवानोंका’ची कल्पना सुचली! वाचा मनोरंजक किस्सा...
नया दौर
Follow us on

मुंबई : आपल्या हातातल्या छोट्याशा फोनची कळ दाबताच हवं ते संगीत ऐकण्या-पाहण्याची सोय आज तंत्रज्ञानानं उपलब्ध करून दिली आहे. परंतु, एकेकाळी फक्त पडद्यावरचे चित्रपट आणि रेडिओवरून वाजणारी गाणी यातून भारतीय प्रादेशिकतेचे रंग त्याचं वैविध्य याचं मोठ्या प्रमाणात आदानप्रदान झालं.

जनप्रवाहाला एकत्र बांधून ठेवणारी हिंदी चित्रपट ही मोठी ताकद बनली. 1950 ते 1960 हे देश उभारणीचं दशक होतं आणि ते आदर्शवादी चित्रपटांनी खूप गाजलं. 1957 साली प्रदर्शित झालेला ‘नया दौर’ हा असाच एक चित्रपट. बी. आर. चोप्रा यांच्या दिग्दर्शनातला हा चित्रपट दिलीपकुमार-वैजयंतीमाला यांच्या अभिनयाबरोबरच साहिर लुधियानवी आणि ओ. पी. नय्यर यांच्या गीत संगीतामुळे संस्मरणीय बनला. यातील देशभक्तीपर गीत खूप गाजले.

गाण्याचे बोल :

‘ये देश है वीर जवानोंका

अलबेलोंका मस्तानोंका,

इस देश का यारो क्या कहना,

ये देश है दुनिया का गहना’

प्रभावी शब्दकळा, ढंगदार संगीत आणि पडद्यावरचं जोशपूर्ण नृत्य यामुळे आजमितीला अनेक वर्ष उलटली, तरी या गीतावर रसिकांचे तितकेच प्रेम आजे. या शब्दसुरांना पंजाबच्या उमद्या आणि रांगड्या मातीचा सुगंध आहे.

सगळेच मुळचे पाकिस्तानातले!

या गीताच्या शब्दातला जोश वीररसाची निर्मिती करतो आणि गीताला एका निर्णायक उंचीवर नेऊन ठेवतो. ‘नया दौर’चे संगीतकार ओ. पी. नय्यर, गीतकार साहिर यांच्या आयुष्यातली तरुणाची अनेक वर्ष लाहोरमधे गेली होती. या गीतातले प्रमुख गायक मोहम्मद रफी याचं बालपण लाहोरमध्ये गेलं. तर खुद्द बी. आर. चोप्रा फाळणीपूर्वी लाहोरमध्येच पत्रकार होते. फाळणीनंतर ही मंडळी मुंबईत आली स्थिरावली, तरी पंजाबी गीतसंगीत त्यांच्या मनामध्ये वसलेलं होतं.

अशी सुचली कल्पना

बी. आर. चोप्रांनी ‘नया दौर’च्या आधी 1956 साली ‘एक ही रस्ता’ हा चित्रपट काढला होता, ज्याचा रौप्यमहोत्सव झाला होता. रौप्य महोत्सवी कार्यक्रमासाठी चोप्रांनी पंजाबहून खास भांगडा गीतं गाणाऱ्या कलाकारांचा संच बोलवला होता. त्याचं जोशपूर्ण सादरीकरण पाहून आगामी ‘नया दौर’मध्ये अशी तडकती-फडकती गीतं असावीत असा विचार त्यांच्या मनात आला. मग, तसं संगीत देण्यासाठी ओ. पी. नय्यर यांची निवड झाली. ‘ये देश है वीर जवानोंका’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, ‘रेशमी कुर्ता जाली का’ ही ‘नया दौर’ मधली तीन गीतं अस्सल पंजाबी रंगाची आणि ढंगाची बनवली गेली आहेत. ‘नया दौर’ चित्रपटासाठी गायक मोहम्मद रफी, संगीतकार ओ.पी.नय्यर आणि अभिनेता दिलीप कुमार तिघांचाही फिल्मफेअर पुरस्कारने गौरव झाला. चाळीस वर्षानंतर 2007 साली चोप्रा मंडळीनी ‘नया दौर’ रंगीत रुपात प्रेक्षकांसाठी पुन्हा सादर केले आणि ‘ये देश है दुनिया का गहना’ हे शब्दसूर मग चित्रपटगृहांमधे दुमदुमत राहिले.

हेही वाचा :

फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत रिया कपूर करते सोनमची बरोबरी, पाहा फोटो

कारगिलमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्याची कथा, वाचा कसा आहे ‘शेरशाह’ चित्रपट