Sushmita Sen: एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत पार्टी करताना दिसली सुष्मिता सेन; व्हिडिओ पाहून नेटकरी झाले चकीत!

अवघ्या काही मिनिटांचा हा लाईव्ह व्हिडिओ होता, पण त्यात सुष्मिता तिच्या कुटुंबीयांसोबत अत्यंत आनंदी दिसली. मात्र व्हिडीओत रोहमनला पाहताच नेटकरी चकित झाले.

Sushmita Sen: एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत पार्टी करताना दिसली सुष्मिता सेन; व्हिडिओ पाहून नेटकरी झाले चकीत!
सुष्मिताच्या पार्टीत ललित मोदी नव्हते पण तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल दिसला.
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 5:21 PM

प्रसिद्ध व्यावसायिक ललित मोदी (Lalit Modi) यांनी जेव्हापासून अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या (Sushmita Sen) नात्याचा खुलासा केला, तेव्हापासून हे दोघंही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. नुकताच सुष्मिताने तिची आई शुभ्रा सेन यांचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त तिने जंगी पार्टीचंही आयोजन केलं होतं. सुष्मिताच्या या पार्टीत ललित मोदी नव्हते पण तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) उपस्थित असल्याचं पहायला मिळालं. या पार्टीदरम्यान सुष्मिताने इन्स्टाग्राम लाईव्ह व्हिडीओ पोस्ट केला आणि आईच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे तिने आभार मानले. यावेळी सुष्मिता सेनसोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोमहनसुद्धा लाईव्ह व्हिडीओत दिसला.

अवघ्या काही मिनिटांचा हा लाईव्ह व्हिडिओ होता, पण त्यात सुष्मिता तिच्या कुटुंबीयांसोबत अत्यंत आनंदी दिसली. मात्र व्हिडीओत रोहमनला पाहताच नेटकरी चकित झाले. सुष्मिता सेनने तिच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीत एक्स बॉयफ्रेंडलाही आमंत्रित केल्यावरून नेटकरी कमेंट्स करू लागले. सुष्मिताच्या दोन मुली रेनी आणि अलिशा यांचंसुद्धा रोहमनसोबत खूप मैत्रीचं नातं आहे. जरी रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन यांचं ब्रेकअप झालं असलं तरी या दोघांमध्ये अजूनही चांगली मैत्री असल्याचं या व्हिडीओतून पहायला मिळालं.

पहा व्हिडीओ

रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही माहिती दिली. ब्रेकअप जरी झाला असला तरी आमच्यातील मैत्री कायम राहील, असं दोघांनी सूचित केलं होतं. सुष्मिता सेनची मुलगी रेनीनेही आजीच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर करत खास संदेश लिहिला आहे. ‘आम्ही नाना म्हणतो त्या सर्वोत्कृष्ट नानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही आमच्या आयुष्यात आहात यासाठी आम्ही खूप भाग्यवान आहोत. तुमचं पुढील वर्ष खूप चांगलं जावो,’ अशा शब्दांत तिने आजीविषयी प्रेम व्यक्त केलं.