Sushmita Sen | सुष्मिता सेनचा स्विमिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पोस्ट शेअर करताना अभिनेत्री म्हणाली की…

सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समुद्रात डुबकी मारताना दिसत आहे. स्विमिंगचा व्हिडिओ पोस्ट करत सुष्मिताने कॅप्शनही लिहिले आहे. सरळ व्हा, एक श्वास घ्या आणि गोष्टी जाऊ द्या. आत्मसमर्पण करा आणि त्यातून शिका, असे सुष्मिताने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Sushmita Sen | सुष्मिता सेनचा स्विमिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, पोस्ट शेअर करताना अभिनेत्री म्हणाली की...
| Edited By: | Updated on: Aug 06, 2022 | 11:16 AM

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे नाते जगजाहिर केले. त्यानंतर एकच चर्चा सुरू आहे. बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांसाठी व्हिडीओ आणि फोटो नेहमीच शेअर करते. नुकताच सुष्मिता सेनने स्विमिंग करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं. या व्हिडीओमध्ये (Video) सुष्मिताचा लूक जबरदस्त दिसतोयं.

इथे पाहा सुष्मिता सेनने शेअर केलेली पोस्ट

सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर

सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समुद्रात डुबकी मारताना दिसत आहे. स्विमिंगचा व्हिडिओ पोस्ट करत सुष्मिताने कॅप्शनही लिहिले आहे. सरळ व्हा, एक श्वास घ्या आणि गोष्टी जाऊ द्या. आत्मसमर्पण करा आणि त्यातून शिका, असे सुष्मिताने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सुष्मिता सेनचा नवीन व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री सुष्मिता सेन एका जहाजेवर आहे. पोहण्यासाठी तिने तोंडाला ब्रीदिंग मास्क लावला आहे. सुष्मिताने काळ्या स्पॅगेटी टॉपसह पांढरा स्कर्ट घातला आहे. ज्यामध्ये तिचा लूक अत्यंत भारी दिसतोयं. सुष्मिता सेन जहाजेच्या काठावर बसून समुद्रात उडी मारताना दिसते. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हिडीओ शेअर करताना सुष्मिताने लिहिले की…

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. सुष्मिता अनेकदा तिच्या दोन्ही मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचा खास फोटो शेअर करत रिलेशनमध्ये असल्याची माहिती सर्वांना दिली होती. त्यानंतर अनेकांना मोठा धक्काच बसला होता. आयपीएल किंग ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या दिवसांपासून सुरू होत्या.