AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Liger Movies | विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या लाइगर चित्रपटातील नवीन गाणे ‘आफत’ रिलीज…, चाहत्यांची उत्सुकता वाढली

या चित्रपटातून विजय देवरकोंडाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, तर अनन्या पांडेही या चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन देखील या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Liger Movies | विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या लाइगर चित्रपटातील नवीन गाणे 'आफत' रिलीज..., चाहत्यांची उत्सुकता वाढली
| Edited By: | Updated on: Aug 06, 2022 | 10:20 AM
Share

मुंबई : विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे यांचा बहुप्रतिक्षित ‘लाइगर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार  सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील दोन गाणी यापूर्वीच रिलीज झाली आहेत, मात्र आता ‘आफत’ हे चित्रपटाचे (Movie) तिसरे गाणेही नुकताच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात अनन्या आणि विजय रोमान्स करताना दिसतायंत. चाहत्यांना विजय आणि अनन्याचे हे गाणे प्रचंड आवडलेले दिसते आहे. गाण्यात राम्या कृष्णन (Ramya Krishnan) किचनमध्ये विजय देवरकोंडासाठी काहीतरी बनवताना दिसत आहे आणि त्याचदरम्यान अनन्या पांडेची एन्ट्री होते.

इथे पाहा विजय आणि अनन्याचे रिलीज झालेले गाणे

अन्यया आणि विजयचे  रोमँटिक गाणे

अन्यया आणि विजयचे हे गाणे रोमँटिक आहे. परंतु ते अगदी वेगळ्या पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. आधीच्या दोन्ही गाण्यांपेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहे, जे लोकांमध्ये क्रेझही आणत आहे. विजय देवरकोंडाची फॅन फॉलोइंग खूप जास्त असल्याने अनन्याला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. नुकताच ‘आफत’ या गाण्याचा टीझर रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला आहे.

लाइगरमधून विजय देवरकोंडाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

या चित्रपटातून विजय देवरकोंडाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, तर अनन्या पांडेही या चित्रपटातून साऊथमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन देखील या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा

हा बॉलिवूड चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा फिल्म आहे. विजयच्या सोबत या चित्रपटाच अनन्या पांडे दिसणार आहे. या राम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे हे देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 25 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह

हा एक बिग बजेट चित्रपट आहे आणि निर्मात्यांसह त्याचे चाहतेही चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहतायत. टिझरलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लाइक केलं जातंय, सिनेमा तर हीट होणारच, अशी सर्वांना अपेक्षा आहे. तो बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल, असं बोललं जातंय. या चित्रपटात त्यानं जगप्रसिद्ध बॉक्सर माइक टायसनसोबत बॉक्सिंगही केलीय.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.