Taapsee Pannu: “माझी सेक्स लाईफ तेवढी..”; ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये आमंत्रित न करण्यावर तापसीचं मत

कॉफी विथ करणच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये करीना कपूर खान आणि आमिर खान यांची हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये करणने विचारलेल्या प्रश्नांवरून त्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील करण्यात आलं.

Taapsee Pannu: माझी सेक्स लाईफ तेवढी..; कॉफी विथ करण 7 मध्ये आमंत्रित न करण्यावर तापसीचं मत
Karan Johar and Taapsee Pannu
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 08, 2022 | 2:53 PM

दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण 7’ (Koffee With Karan 7) या चॅट शोवर अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) उपरोधिक टीका केली आहे. तापसी तिच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होती. या प्रमोशनदरम्यान तिला कॉफी विथ करण या शोविषयी प्रश्न विचारण्यात आला. करणने तुला त्याच्या चॅट शोमध्ये का बोलावलं नाही, असा प्रश्न विचारला असता तापसी म्हणाली, “कॉफी विथ करणचं आमंत्रण येण्याइतकी रंजक माझी सेक्स लाईफ नसेल बहुधा!” करणने (Karan Johar) 2004 पासून या शोची सुरुवात केली. यामध्ये तो स्वत: सूत्रसंचालक असून बॉलिवूडमधील विविध सेलिब्रिटींना आमंत्रित करतो आणि त्यांना विविध प्रश्न विचारतो. सध्या या शोचा सातवा सिझन डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कॉफी विथ करणच्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये करीना कपूर खान आणि आमिर खान यांची हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये करणने विचारलेल्या प्रश्नांवरून त्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील करण्यात आलं. “मूल झाल्यावर कोणत्या क्वालिटीचा सेक्स करायला मिळतो”, असा प्रश्न करणने करीनाला विचारला होता. त्यावर करीनाने त्याला उत्तर दिलं, “तुला माहितीच असेल, तू सुद्धा यश आणि रुही या जुळ्या मुलांचा पिता आहेस.” हे ऐकताच करण म्हणतो की त्याची आई हा शो पाहत असल्याने तो त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही किंवा त्याबद्दल बोलू शकणार नाही. यावर आमिर करणला प्रश्न विचारतो, “इतरांच्या सेक्स लाईफबद्दल तू बोलल्याने त्यांना काही वाटत नाही का? कसे प्रश्न विचारत आहेस?”

पहा व्हिडीओ-

‘कॉफी विथ करण 7’च्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. यावेळीसुद्धा करणने रणवीर आणि आलियाला सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारले होते. याशिवाय अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, सारा अली खान, जान्हवी कपूर यांनीसुद्धा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली होती.