AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koffee With Karan 7: एक्सबाबत सारा अली खानचं उत्तर ऐकून जान्हवीला हसू अनावर; करण जोहरने घेतली दोघींची फिरकी

या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये करणने दोघांना त्यांच्या क्रशबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. यावेळी सारा अली खान आणि जान्हवी कपूरने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

Koffee With Karan 7: एक्सबाबत सारा अली खानचं उत्तर ऐकून जान्हवीला हसू अनावर; करण जोहरने घेतली दोघींची फिरकी
Janhvi Kapoor and Sara Ali KhanImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 5:53 PM
Share

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा बहुचर्चित चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सिझनच्या (koffee with karan 7) दुसऱ्या एपिसोडचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट पाहुणे म्हणून आले होते. आता दुसऱ्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या दोन खास मैत्रिणी अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांनी हजेरी लावली आहे. या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये करणने दोघांना त्यांच्या क्रशबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. यावेळी सारा अली खान आणि जान्हवी कपूरने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

टीझर व्हिडिओमध्ये करण साराला विचारतो की सध्या तिला कोणावर क्रश आहे? त्यावर उत्तर देताना सारा ही विजय देवरकोंडाचं नाव घेते. ते ऐकून तिच्या शेजारी बसलेल्या जान्हवीला हसू अनावर होतं. यानंतर करण जान्हवीला उद्देशून काही म्हणतो, तितक्यात साराने जान्हवीला विचारले की तिला विजय देवरकोंडा आवडतो का?

पहा प्रोमो-

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या सिझनमध्ये करणने साराला तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयीही प्रश्न विचारला आहे. गेल्या सिझनमध्ये जेव्हा साराने वडील सैफ अली खानसोबत हजेरी लावली होती, तेव्हा तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटादरम्यान दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. यावरूनच करणने तिला प्रश्न विचारला की ‘तुझा एक्स हा एक्स का बनला आहे?’ या प्रश्नाचं उत्तर देताना सारा मस्करीत म्हणते, “कारण तो सर्वांचा एक्स आहे”. हे ऐकून जान्हवी आणि करण जोरजोरात हसू लागतात.

‘कॉफी विथ करण 7’चा दुसरा एपिसोड कधी येणार? कॉफी विथ करण सीझन 7 हा चॅट शो आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबत गेल्या आठवड्यात सुरू झाला होता. पुढचा एपिसोड 14 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एपिसोड गुरुवारी, 14 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता Disney+Hotstar वर तुम्ही पाहू शकता.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.