आलिया भट्ट यशस्वी फक्त या माणसामुळे, वाचा ऐश्वर्या राय नेमके काय म्हणाली…

पुढे ऐश्वर्या म्हणाली की, आलिया अनेक चांगल्या संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे ती खूप जास्त फास्ट पुढे जाते आहे. मला खरोखरच आलियाचे काैतुकही वाटते, असेही ऐश्वर्या म्हणालीयं. ऐश्वर्या रायचा हा व्हिडीओ जुना आहे.

आलिया भट्ट यशस्वी फक्त या माणसामुळे, वाचा ऐश्वर्या राय नेमके काय म्हणाली...
| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 12:45 PM

मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून आलियाने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर एका मागून एक प्रोजेक्ट आलियाला मिळाले. काही दिवसांपूर्वीच आलियाचा गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आतापर्यंत आलियाने बाॅलिवूडला (Bollywood) अनेक हिट चित्रपट दिले. महेश भट्ट यांची मुलगी असल्याने आलियाला प्रमोट केले जात असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आलायं. मात्र, आलियाच्या प्रत्येक चित्रपटाला चाहत्यांचे प्रेम देखील मिळते.

इथे पाहा ऐश्वर्या रायचा व्हायरल होणारा व्हिडीओ

सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनचा एक जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोयं. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने आलिया भट्ट विषयी एक मोठे भाष्य केले असून तो व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलायं. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या म्हणते की, आलिया चांगले काम करते हे सर्व खरे असले तरीही सुरूवातीच्या काळात करण जोहरने तिला खूप जास्त सपोर्ट केलायं. त्यामुळे काम करताना आलियाला कोणत्याही अडचणी नक्कीच आल्या नाहीयंत. आलियाने नेहमीच एक कंफर्ट झोनमध्ये काम केले.

आलिया भट्टने करण जोहरमुळे नेहमीच केले कंफर्ट झोनमध्ये काम

पुढे ऐश्वर्या म्हणाली की, आलिया अनेक चांगल्या संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे ती खूप जास्त फास्ट पुढे जाते आहे. मला खरोखरच आलियाचे काैतुक वाटते, असेही ऐश्वर्या म्हणालीयं. ऐश्वर्या रायचा हा व्हिडीओ जुना आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोयं. कारण एका मागून एक चित्रपट आलिया भट्टला मिळत असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.