Throwback Thursday: पहचान कौन? बॉलिवूडमधल्या या स्टारकिड्सना ओळखलात का?

बॉलिवूडच्या कपूर (Kapoor Family) घराण्यातील हे दोन स्टारकिड्स आहेत. अर्थात कपूर म्हटल्यावर करीना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर हे सेलिब्रिटी आठवतात, पण हे दोन स्टारकिड्स त्या कुटुंबातील नाहीत.

Throwback Thursday: पहचान कौन? बॉलिवूडमधल्या या स्टारकिड्सना ओळखलात का?
ओळखलंत का या सेलिब्रिटींना?
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 10, 2022 | 10:47 AM

सोशल मीडियावर एका स्टारकिडने (Starkids) त्याच्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त हा खास फोटो पोस्ट केला आहे. त्याची बहीणसुद्धा बॉलिवूडमधील (Bollywood) स्टारकिडच आहे. या फोटोमधील दोन स्टारकिड्सना तुम्ही ओळखलात का? बॉलिवूडच्या कपूर (Kapoor Family) घराण्यातील हे दोन स्टारकिड्स आहेत. अर्थात कपूर म्हटल्यावर करीना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर हे सेलिब्रिटी आठवतात, पण हे दोन स्टारकिड्स त्या कुटुंबातील नाहीत. तर अनिल कपूर आणि बोनी कपूर यांची ही मुलं आहेत. या फोटोमधील मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी सोनम कपूर आहे. सोनमच्या 37व्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देण्यासाठी अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच त्याने सोनमसाठी खास पोस्टसुद्धा लिहिली आहे.

‘हॅपी बर्थडे सोनम कपूर. हा फोटो आपल्या दोघांचं अगदी अचूकपणे वर्णन करतो. तू अत्यंत उत्साही आणि मी विचारांमध्ये गुंतलेला. वेळे खूप पुढे निघून गेली, पण आपल्यात काहीच बदललं नाही. फक्त आपण लहानाचे मोठे झालो आहोत आणि आता तू एका बाळाची आई होणार आहेस. मला तुझा नेहमीच अभिमान आहे आणि आनंद अहुजासारखी खंबीर साथ तुला असतानाही मी कायम तुझ्या पाठिशी उभा राहीन. खरंतर मी तुझ्यापेक्षा फक्त 17 दिवसांनी लहान आहे पण तुझा उत्साह पाहता तू लहान आणि मीच मोठा आहे असं मला वाटतं’, अशा शब्दांत अर्जुनने भावना व्यक्त केल्या आहेत.

पहा फोटो-

अर्जुनच्या या पोस्टवर सोनम कपूरने ‘लव्ह यू सो मच’ अशी कमेंट लिहित हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे. तर सोनम कपूरचा पती आनंद अहुजा यानेसुद्धा कमेंट केली आहे. ‘या फोटोमध्ये तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव कमाल आहेत आणि तेच हावभाव तुमच्या दोघांमधील खास नातं सांगून जातं. तू अत्यंत साधा आणि ती तुला चिडवताना दिसतेय’, अशी प्रतिक्रिया आनंदने लिहिली. इंडस्ट्रीतील इतरही कलाकारांनी यावर कमेंट करत सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वरा भास्कर, आनंद एल, राय, मलायका अरोरा, मसाबा गुप्ता, कुब्रा सैत, अथिया शेट्टी, दिया मिर्झा, इशा गुप्ता, अनुष्का शर्मा या कलाकारांनी सोनमवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सोनमने 8 मे 2018 रोजी आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती लंडनला राहायला गेली. कामानिमित्त ती भारतात ये-जा करते. सोनम लवकरच ‘ब्लाइंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये पुरब कोहली, विनय पाठक आणि लिलेट दुबे यांच्याही भूमिका आहेत.