Maharashtra Election News LIVE : नितीन गडकरींच्या माजी स्वीय सहाय्यकांच्या मुलाची बंडखोरी
BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : महापलिका निवडणुकांच्या मतदानासाठी अवघे 14 दिवस उरले आहेत. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांचा धडाका सुरू होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
भाजपला मराठी महापौर होऊ द्यायचा नाही- संजय राऊत
राज्यात संविधानाचा भंग करण्याचं काम सुरू आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभा होणार आहेत. ठाकरे बंधू वचननामा एकत्रित सादर करणार आहेत. मीरा-भाईंदर ठाण्यात एकत्र सभा होतील, असं राऊतांनी सांगितलं.
-
विधानसभा अध्यक्ष असल्याचा राहुल नार्वेकरांना विसर- संजय राऊत
विधानसभा अध्यक्ष असल्याचा राहुल नार्वेकरांना विसर पडला आहे. राहुल नार्वेकरांकडून दमदाटी होते, हे सत्य आहे. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांनी निष्पक्ष असावं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
-
-
नागपुरात RSS च्या स्वयंसेवकांचाही बंडाचा बिगूल
नितीन गडकरींच्या माजी स्वीय सहाय्यकांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. फॉरवर्ड ब्लॉकची उमेदवारी घेऊन निनाद दीक्षित निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठे नाराजीनाट्य
भाजपासह अनेक पक्षांमध्ये कार्यकर्त्ये नाराज झाल्याचे बघायला मिळतंय. पक्षाचे काम करूनही तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले आहे.
-
जिल्हा परिषदची आचारसंहिता लवकरच लागणार
पुणे पिंपरी चिंचवड मध्ये शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार. आज मी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. थंडी खूप आहे. सर्व निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे सूचना जे आहे ते देण्यात आलेले आहेत. चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली आहे.
-
-
अर्ज छाननीच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत हाय होल्टेज ड्रामा
प्रभाग क्रमांक 15 ब अणि ड या दोन्ही प्रभागामध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या. तर सुनावणी होऊन निकाल तब्बल सात ते आठ तासांनी देण्यात आला. मात्र सर्वच अर्ज वैद्य ठरवण्यात आले… भाजपचे उमेदवार दत्ता गाडळकर यांच्यावर अपक्ष उमेदवार आदेश जाधव यांनी संपत्तीवरून हरकत घेतली होती.
-
सोलापुरातील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेने बंद पाडला
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याशी संबंधित हा साखर कारखाना आहे. उसाची पहिली उचल 3 हजार रुपये आणि 3500 रुपये भाव द्या या मागणीसाठी कारखाना बंद पाडला. उसाच्या गव्हाणीत उड्या मारत हा कारखाना बंद पाडला. कारखाना प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा सुरु आहे
-
-
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भविक अक्कलकोटमध्ये दाखल
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अक्कलकोट नगरी भक्तांनी फुलून गेली. दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविक अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी येतात. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनाने करण्यासाठी दरवर्षी हजारोच्या संख्येने स्वामींभक्त अक्कलकोटला येतात. यंदाच्या वर्षी देखील तशीच गर्दी अक्कलकोटमध्ये पाहायला मिळतेय
-
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवारांना मोठा धक्का, 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज अवैध
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. 6 झोनमधील तब्बल 11 उमेदवारांचे नामांकन अर्ज अवैध, जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्याने कारवाई करण्यात आली आहे. अनामत रक्कम न भरल्याने अनेक अर्ज बाद झाले आहेत. भाजपसह विविध पक्षांना फटका बसला आहे.
-
कोल्हापूरमध्ये इनोव्हा कारने उडवलं, तिघांचा मृत्यू
कोल्हापूरमध्ये इनोव्हा कारने उडवल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात हा भयानक अपघात झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
-
सातारा : कास पठाराजवळ 400 फूट दरीत कोसळला युवक
सातारा : 31 डिसेंबर निमित्त पार्टीसाठी गेलेला युवक कास पठाराकडे 400 फूट दरीत कोसळला. आदित्य कांबळे असे जखमी युवकाचे नाव आहे. छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने युवकाला डोंगराच्या खालील बाजूस असणाऱ्या महादरे जंगलातून त्याला रेस्क्यू करण्यात आलं. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
-
पुणे – मध्यरात्री बिबट्याचा अंगणात प्रवेश; श्वानांच्या धाडसामुळे अनर्थ टळला
शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे मध्यरात्री बिबट्याने थेट घराच्या अंगणात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडली. श्वानाच्या शोधात असलेला बिबट्या अंगणात शिरताच घरातील धाडसी श्वानांनी त्याच्यावर भुंकत पाठलाग केला, त्यामुळे बिबट्याला पळ काढावा लागला. यामुळे चांगलीच खळबळ माजली असून नागरिक दहशतीखाली आहेत.
-
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
आजपासून 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होत असून, वर्षाची पहिलीच सकाळ देवीच्या दर्शनाने पावन करण्यासाठी तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक तुळजापूरकडे दाखल झाले आहेत.
-
शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. रात्रभरापासून भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेता येत आहे. मंदिरात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. दूरवरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे.
आजपासून २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात होत असून, वर्षाची पहिलीच सकाळ देवीच्या दर्शनाने पावन करण्यासाठी भाविकांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गर्दी केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मंदियाळ पहायला मिळाली. शिर्डीतही नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी गर्दी दिसली. नवीन वर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला दोन टन फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली. नववर्षाच्या स्वागताला मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला. सीएसएमटी, दादर परिसराला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे मुंबईकरांची मोठी त्रेधातिरपीट उडाली. यासह राज्यातील, देशविदेशातील इतर अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Jan 01,2026 7:56 AM
