‘उसकी हटेगी तो सबकी फटेगी’, पाहा टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉनच्या ‘गणपथ’चा दमदार टीझर!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon) यांची जोडी प्रेक्षकांनी 'हिरोपंती'मध्ये देखील एकत्र पाहिली आहे. त्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.

‘उसकी हटेगी तो सबकी फटेगी’, पाहा टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉनच्या ‘गणपथ’चा दमदार टीझर!
गणपथ
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 5:25 PM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि क्रिती सॅनन (Kriti Sanon) यांची जोडी प्रेक्षकांनी ‘हिरोपंती’मध्ये देखील एकत्र पाहिली आहे. त्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. काही वेळापूर्वीच, टायगरने त्याच्या पुढील चित्रपट ‘गणपथ’शी (Ganpath) संबंधित एक विशेष व्हिडीओ रिलीज केला आहे. जिथे त्याने क्रितीसोबत त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

टायगर श्रॉफचा ‘गणपथ’ हा चित्रपट पुढच्या वर्षी 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅननचा हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित करत आहे. आज प्रदर्शित झालेल्या या टीझर व्हिडीओमध्ये आपल्याला या चित्रपटाशी संबंधित टायगर श्रॉफचा लूक देखील पाहायला मिळतो आहे. या चित्रपटात अभिनेत्याची एकदम हटके स्टाईल दिसते आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ पहिल्यांदा गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा व्हिडीओ शेअर करताना टायगर श्रॉफने लिहिले की, ‘उसकी हटेगी तो सबकी फटेगी, आरेला है ‘गणपत’, तैयार रहना!’ 23 डिसेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर एका टपोरी भाईच्या शैलीत दिसणार आहे.

पाहा टीझर :

या चित्रपटाची टीम या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे, जिथे या व्हिडीओमध्ये टायगर म्हणतो अपुन के दो ही बाप हैं, एक गॉड और दूसरी जनता, दोनों ने बोला आने को …तो अपुन आ रहा है.’ या संपूर्ण व्हिडीओमध्ये जे बॅकग्राउंड म्युझिक चालू आहे, ते खूप दमदार वाटते. या चित्रपटाची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. जिथे काही महिन्यांपूर्वी क्रिती सॅननचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या मोशन पोस्टरमध्ये अभिनेत्रीची दमदार स्टाईल होती, ज्यात ती बाईकवर बसलेली दिसली.

पाहा क्रितीचे पोस्टर :

हे पोस्टर शेअर करताना क्रितीने लिहिले, ‘जेसीला भेटा… यासाठी सुपर डुपर उत्साहित आहे!! माझ्या अतिशय खास मित्रासोबत अर्थात टायगर श्रॉफसोबत पुन्हा एकदा एकत्र आले आहे.’ या चित्रपटाव्यतिरिक्त टायगर श्रॉफ ‘बागी 4’ आणि ‘हिरोपंती 2’ मध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे दोन्ही कलाकार तब्बल 25 देशांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करणार आहेत. टायगर आता या चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू करतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा :

मुंबईत खासगी विमानतळावर ऐश्वर्या राय-बच्चन स्पॉट, ड्रेसमुळे प्रेग्नंट असल्याची चर्चा

नातं रक्तापलिकडचं…’आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्री रुपाली भोसलेला मिळाला नवा भाऊ