Vikram Vedha: ‘विक्रम वेधा’च्या ट्रेलरवर कमेंट्सचा वर्षाव; हृतिक-सैफ बॉलिवूडचं नशीब पालटणार?

'डायलॉग, ॲक्शन, सस्पेन्स, थ्रिल, स्वॅग.. सगळं काही भन्नाट', अशा शब्दांत एका युजरने प्रतिक्रिया दिली. तर बॉलिवूडसाठी लवकरच चांगले दिवस येतील, असंही काही जण म्हणतायत.

Vikram Vedha: विक्रम वेधाच्या ट्रेलरवर कमेंट्सचा वर्षाव; हृतिक-सैफ बॉलिवूडचं नशीब पालटणार?
Vikram Vedha Trailer
Image Credit source: Youtube
| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 6:47 PM

अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. हृतिक आणि सैफचा हा चित्रपट बॉलिवूडचं नशीब पालटेल, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. बॉक्स ऑफिसवर तो तुफान गाजेल, असाही अंदाज काही युजर्स वर्तवत आहेत. ‘अपेक्षेपेक्षा खूप चांगला ट्रेलर आहे’, असंही एका युजरने म्हटलंय. येत्या 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘डायलॉग, ॲक्शन, सस्पेन्स, थ्रिल, स्वॅग.. सगळं काही भन्नाट’, अशा शब्दांत एका युजरने प्रतिक्रिया दिली. तर बॉलिवूडसाठी लवकरच चांगले दिवस येतील, असंही काही जण म्हणतायत. पुष्कर आणि गायत्री या जोडीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये सैफ आणि हृतिकसोबतच राधिका आपटे, रोहित सराफ, योगिता बिहानी, सत्यदीप मिश्रा आणि शारीब हाश्मी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

2 मिनिटं 50 सेकंदांच्या या ट्रेलरची सुरुवात सैफ अली खान आणि हृतिक रोशनच्या जबरदस्त लूकने होते. या दोघांमध्ये चांगली टक्कर चित्रपटात पहायला मिळेल, हे ट्रेलर पाहून स्पष्ट होतंय. दमदार संवाद, अ‍ॅक्शन सीक्वेन्सचा भरणा, आकर्षक पार्श्वसंगीत आणि खिळवून ठेवणाऱ्या नाट्याने परिपूर्ण असा हा ट्रेलर आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) गँगस्टर वेधाला (हृतिक रोशन) पकडतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो.

गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केलं असून निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.