डिलीवरीच्या अवघ्या दीड महिन्यामध्येच कपड्याला उलटे लटकून हा खास योगा करताना दिसली आलिया भट्ट

आलियाची डिलीवरी होऊन फक्त दीड महिन्याच झाला असता तिने आता स्वत: च्या फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरूवात केलीये.

डिलीवरीच्या अवघ्या दीड महिन्यामध्येच कपड्याला उलटे लटकून हा खास योगा करताना दिसली आलिया भट्ट
| Updated on: Dec 24, 2022 | 6:34 PM

मुंबई : आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या मुलीचे नाव देखील जाहिर केले. इतकेच नाहीतर राहाचे नाव सांगताना तिने राहा या नावाचा अर्थही सांगून टाकला होता. आलिया आणि रणबीरच्या मुलीचे नाव आजी नीतू कपूर यांनी ठेवले आहे. आलियाची डिलीवरी होऊन फक्त दीड महिन्याच झाला असता तिने आता स्वत: च्या फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरूवात केलीये. अनेकदा आलिया जिममध्ये जाताना दिसते.

नुकताच आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर तिचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जो आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया ही एरियल योगा करताना दिसत आहे. आलियाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आलिया भट्टच्या डिलीवरीला फक्त दीड महिना झालेला असतानाच तिने इतका जास्त अवघड योगा केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आलिया भट्ट हिने मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. डिलीवरीनंतर आलिया फिट राहण्यासाठी मेहनत करत आहे.

आलिया हिने पोस्ट शेअर करताना लिहिले, डिलीवरीच्या दीड महिन्यांनंतर हळूहळू हे करण्याचा प्रयत्न करत आहे. @anshukayog च्या पुर्णपणे मार्गदर्शनाखाली मी हे सर्व करत आहे. सर्वच मातांना मी विनंती करते की, डिलीवरीनंतर आपल्या शरीराचे ऐकायला हवे.

असे अजिबातच काही करू नका की, ज्यासाठी तुमचे शरीर तयार नाहीये. आलियाने पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, मी व्यायाम करण्यास जेंव्हा सुरूवात केली तेंव्हा मी फक्त श्वास घेतला आणि वाॅक केला. आपल्या शरीराने जे केले त्याचे काैतुक करा.

आलियाने लिहिले की, खरोखरच बाळाला जन्म देणे एखाद्या चमत्कारासारखेच आहे. व्यायाम करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या, असेही आलिया म्हटली आहे. आता आलिया हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.