Vijay Deverakonda: ‘लायगर’साठी विजय देवरकोंडाने घेतलं तब्बल इतकं मानधन; चित्रपट हिट ठरल्यास वाढवणार फी

| Updated on: Aug 24, 2022 | 3:40 PM

या चित्रपटाचं बजेट जवळपास 90 कोटींच्या घरात असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दिली. इंडस्ट्रीतील हा सर्वांत मोठा ॲक्शन चित्रपट असेल असं म्हटलं जातंय.

Vijay Deverakonda: लायगरसाठी विजय देवरकोंडाने घेतलं तब्बल इतकं मानधन; चित्रपट हिट ठरल्यास वाढवणार फी
Vijay Deverakonda
Image Credit source: Instagram
Follow us on

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) ‘लायगर’ (Liger) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विजयने अर्जुन रेड्डी, डिअर कॉम्रेड यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलं. लायगर हा त्याचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट उद्या म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याने अभिनेत्री अनन्या पांडेसोबत (Ananya Panday) भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघं देशातील विविध शहरांत फिरून चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. या चित्रपटातून अनन्या ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. दाक्षिणात्य सुपरस्टार असलेल्या विजयने या पहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी किती मानधन घेतलं हे तुम्हाला माहित आहे का?

या चित्रपटाचं बजेट जवळपास 90 कोटींच्या घरात असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दिली. हा तेलुगू आणि हिंदी अशा दोन भाषेतील चित्रपट असल्याने विजयने जवळपास 20 ते 25 कोटी रुपये मानधन घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दाक्षिणात्य चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्यासाठी मानधनाची ही रक्कम बरीच मोठी असल्याचं मानलं जात आहे. करण जोहरची धर्मा प्रॉडक्शन्स कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

हे सुद्धा वाचा

लायगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला तर त्यानंतर विजय त्याचं मानधन वाढवू शकतो, असाही अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित या चित्रपटाचं प्रमोशन जवळपास गेल्या 40 दिवसांपासून संपूर्ण देशभरात केलं जात आहे. विजय आणि अनन्या मॉलमध्ये, विविध ठिकाणी चाहत्यांची भेट घेत आहेत आणि विविध मुलाखतीसुद्धा देत आहेत. इंडस्ट्रीतील हा सर्वांत मोठा ॲक्शन चित्रपट असेल असं म्हटलं जातंय. या चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्ससाठी विजयने खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात विजय आणि अनन्यासोबत माजी प्रोफेशनल बॉक्सर माइक टायसनसुद्धा झळकणार आहे.