Liger Trailer: विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’चा जबरदस्त ट्रेलर; हॉलिवूडलाही टक्कर देणारा ॲक्शनपट

विजयचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असला तरी बॉलिवूड प्रेक्षकांसाठी तो काही नवा कलाकार नाही. ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या यशामुळे देशभरात त्याला प्रसिद्धी मिळाली. ‘अर्जुन रेड्डी’ या विजयच्या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता.

Liger Trailer: विजय देवरकोंडाच्या 'लायगर'चा जबरदस्त ट्रेलर; हॉलिवूडलाही टक्कर देणारा ॲक्शनपट
Vijay Deverakonda's Liger
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 21, 2022 | 9:52 AM

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) आगामी चित्रपट ‘लायगर’ची (Liger Trailer) प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज (21 जुलै) हैद्राबादच्या सुदर्शन थिएटरमध्ये लाँच केला जाणार आहे. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर ट्रेलर लाँचिंगदरम्यान बाईक रॅलीसुद्धा काढली जाणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेतल्या चित्रपटांपैकी एक आहे. येत्या 25 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच टॉलिवूड आणि बॉलिवूड एकत्र येत आहेत. विजयने सोशल मीडियावर या ट्रेलरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

जबरदस्त ॲक्शनपट

जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शनचा तडका पहायला मिळतोय. यात संवाद फारच कमी आहेत. विजय आणि अनन्यासोबतच यामध्ये रम्या कृष्णन, मकरंद देशपांडे आणि रॉनित रॉय यांच्याही भूमिका पहायला मिळत आहे. ट्रेलरच्या अखेरीस बॉक्सर माइक टायसनची एण्ट्री पहायला मिळते.

ट्रेलर लाँचिंगदरम्यान बाईक रॅली

‘लायगर’ या चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तेलुगू चित्रपटांमध्ये विजयने आधीच आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता तो करण जोहरच्या ‘लायगर’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. इंडस्ट्रीतील हा सर्वांत मोठा ॲक्शन चित्रपट असेल असं म्हटलं जातंय. या चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्ससाठी विजयने खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात विजय आणि अनन्यासोबत माजी प्रोफेशनल बॉक्सर माइक टायसनसुद्धा झळकणार आहे. आज होणाऱ्या ट्रेलर लाँचदरम्यान विजय स्वत: बाईक रॅली काढणार आहे. ही बाईक रॅली इंदिरा पार्क ते सुदर्शन थिएटरपर्यंत काढली जाईल. हैद्राबादच्या सुदर्शन थिएटरमध्येच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला जाईल. तर मुंबईतील अंधेरी इथल्या सिनेपोलीसमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता ट्रेलर लाँच केला जाईल.

पहा ट्रेलर-

विजयचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असला तरी बॉलिवूड प्रेक्षकांसाठी तो काही नवा कलाकार नाही. ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या यशामुळे देशभरात त्याला प्रसिद्धी मिळाली. ‘अर्जुन रेड्डी’ या विजयच्या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. ज्यामध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवरकोंडा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे. ‘लायगर’ची सिनेमॅटोग्राफी विष्णू सरमा यांनी केली आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय आणि अनन्याशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. करण जोहर आणि अपूर्व मेहता या चित्रपटाची एकत्र निर्मिती करत आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें