AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Deverakonda: जगविख्यात बॉक्सर माईक टायसनसाठी विजय देवरकोंडाची खास पोस्ट, ‘आयुष्यभरासाठी एक आठवण..’

'लायगर' या चित्रपटात माईक टायसन महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ते एका भारतीय चित्रपटात काम करत आहेत. त्यामुळे मोठ्या पडद्यावर विजय देवरकोंडा आणि माईक टायसन यांची टक्कर पाहणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असेल.

Vijay Deverakonda: जगविख्यात बॉक्सर माईक टायसनसाठी विजय देवरकोंडाची खास पोस्ट, 'आयुष्यभरासाठी एक आठवण..'
Vijay Deverakonda and Mike TysonImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 01, 2022 | 12:00 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आगामी ‘लायगर’ (Liger) या चित्रपटात तो जगविख्यात बॉक्सर माईक टायसनसोबत (Mike Tyson) भूमिका साकारताना दिसणार आहे. माईक टायसनच्या वाढदिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. विजयची हीच पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्हाला भेटण्याचं स्वप्नसुद्धा मी कधी पाहिलं नव्हतं. तुमच्यासोबत करायला मिळालेल्या सर्व गोष्टी एका बाजूला पण तुम्ही आयुष्यभरासाठी एक अविस्मरणीय आठवण आहात’, असं विजयने लिहिलं. ‘लायगर’ या चित्रपटात माईक टायसन महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ते एका भारतीय चित्रपटात काम करत आहेत. त्यामुळे मोठ्या पडद्यावर विजय देवरकोंडा आणि माईक टायसन यांची टक्कर पाहणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असेल.

पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेतल्या चित्रपटांपैकी एक आहे. अभिनेत्री अनन्या पांडे यात विजयसोबत भूमिका साकारणार आहे. येत्या 25 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विजयने ट्विटरवर माईक टायसनसोबतचे सेटवरील काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवरकोंडा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे. ‘लायगर’ची सिनेमॅटोग्राफी विष्णू सरमा यांनी केली आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय आणि अनन्याशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. करण जोहर आणि अपूर्व मेहता या चित्रपटाची एकत्र निर्मिती करत आहेत.

विजय देवरकोंडाची पोस्ट-

जगातील सर्वात महान बॉक्सर्समध्ये माईक टायसनचं नाव आवर्जून घेतलं जातं. 1985 ते 2005 पर्यंत ते बॉक्सिंग क्षेत्रात कार्यरत होते. 1992 साली माईकवर बलात्काराचे आरोप झाले होते. ते आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना 6 वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. बॉक्सिंग पाठोपाठ ते अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहेत. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हँगओव्हर’ या हॉलिवूड चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. त्यानंतर 2011 मध्ये ‘हँगओव्हर 2’मध्येही ते झळकले.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.