AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावेळी हार्दिक पांड्याने केलं असं काही, सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना संपला, पण चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाही. भारताने या सामन्यात पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे, हार्दिक पांड्याची राष्ट्रगीतावेळी केलेली कृती व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावेळी हार्दिक पांड्याने केलं असं काही, सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल
पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावेळी हार्दिक पांड्याने केलं असं काही, सोशल मीडियावर Video होतोय व्हायरलImage Credit source: PTI
| Updated on: Feb 16, 2026 | 8:02 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धचा हायव्होल्टेज सामना भारताने 61 धावांनी जिंकला. भारताने या सामन्यात पाकिस्तानचं कुठेच वजन वाढू दिलं आहे. नाणेफेकीचा कौल गमावणे आणि पहिल्या षटकातील विकेट सोडता भारतीय संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्या फलंदाजीत काही योगदान देऊ शकला नाही. पण गोलंदाजीत त्याने कमाल केली. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव निश्चित झाला. असं असताना हार्दिक पांड्याची एक कृती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावेळी त्याची कृती भारतीयांचं मन जिंकत आहे. त्यामुळे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रगीतावेळी दोन्ही हातांची घडी घातली होती.

भारत पाकिस्तान सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेच्या कोलंबोत झाला.  या सामन्यात नाणेफेक पाकिस्तानने जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फिरकीवर भारतीय संघाला गुंडाळू असा फाजील विश्वास त्यांना होता. त्याचे परिणाम काय झाले ते दिसून आलं. नाणेफेकीनंतर दोन्ही संघाचे खेळाडू नाणेफेकीनंतर मैदानात राष्ट्रगीतासाठी आले. जेव्हा पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजलं तेव्हा दोन्ही संघाचे खेळाडू सावधान मुद्रेत उभे होते. पाकिस्तानी खेळाडू त्यांचं राष्ट्रगीत गातही होते. तर भारतीय खेळाडू सावधान मुद्रेत स्तब्ध उभे होते. पण हार्दिक पांड्या हाताची घडी घालून उभा होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्याने साहिबजादा फरहान विकेटही चर्चेत राहिली आहे. त्याचं कारण असं की हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात शून्यावर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. पण या दरम्यान त्याने झेल कसा घेतला हे देखील पाहिलं नाही. साहिबजादाला रागाने पाहातच होता. त्यामुळे या विकेटची चर्चाही रंगली आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 175 धावांची खेळी केली. यात इशान किशनची 77 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. अभिषेक शर्माची विकेट पडल्यानंतरही त्याने आक्रमक बाणा कायम ठेवला होता. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अडचणीत आला. भारताने पाकिस्तानला 114 धावांवर रोखलं आणि हा सामना 61 धावांनी जिंकला.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.