The Kashmir Files: ‘द काश्मीर फाईल्स’ची 250 कोटींकडे यशस्वी वाटचाल; जॉनचा ‘अटॅक’ही ठरला फेल

बॉक्स ऑफिसवर दर आठवड्याला नवनवे चित्रपट दाखल होत असतानाही 'द काश्मीर फाईल्स'ची (The Kashmir Files) 250 कोटींकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत 245.03 कोटींची कमाई केली आहे.

The Kashmir Files: द काश्मीर फाईल्सची 250 कोटींकडे यशस्वी वाटचाल; जॉनचा अटॅकही ठरला फेल
Attack, The Kashmir Files, RRR
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 04, 2022 | 12:35 PM

बॉक्स ऑफिसवर दर आठवड्याला नवनवे चित्रपट दाखल होत असतानाही ‘द काश्मीर फाईल्स’ची (The Kashmir Files) 250 कोटींकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत 245.03 कोटींची कमाई केली आहे. या आठवड्यात जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ आणि ‘मॉर्बियस’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. या दोन नव्या चित्रपटांचं आव्हान आणि स्पर्धेत राजामौलींचा ‘RRR‘ हा बिग बजेट चित्रपट असतानाही द काश्मीर फाईल्सची कमाई सुरूच आहे. 11 मार्च रोजी द काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्याच्या वीकेंडला या चित्रपटाने जवळपास साडेसहा कोटींचा गल्ला जमवला आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

द काश्मीर फाईल्सची वीकेंडची कमाई (चौथा आठवडा)

शुक्रवार- 1.50 कोटी रुपये
शनिवार- 2.25 कोटी रुपये
रविवार- 3 कोटी रुपये

तरण आदर्शचं ट्विट-

RRR ची आतापर्यंतची कमाई-

जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’ची पहिल्या दिवसाची कमाई-

जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’च्या कमाईची सुरुवात काही खास झाली नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.51 कोटी रुपये कमावले. दुसरीकडे एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ची आतापर्यंतची कमाई 164.09 कोटी रुपये झाली आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. त्यावरून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या चित्रपटाचा विरोध केला तर काहींनी चित्रपटातून सत्य समोर आणल्याबद्दल दिग्दर्शकांचे आभार मानले.

हेही वाचा:

Mika Singh: ..अन् मिका सिंगचा पारा चढला; पत्रकाराला केली शिवीगाळ

VIDEO: बायोपिक पाहून टेनिस क्रिकेटचा बाहशाह प्रवीण तांबेंच्या डोळ्यात आलं पाणी