Kaun Hai Pravin Tambe VIDEO: बायोपिक पाहून टेनिस क्रिकेटचा बाहशाह प्रवीण तांबेंच्या डोळ्यात आलं पाणी

क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांचा जीवनपट उलगडणारा 'कौन प्रवीण तांबे' (Kaun Pravin Tambe) हा बायोपिक नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) प्रवीण तांबेंची भूमिका साकारली आहे.

Kaun Hai Pravin Tambe VIDEO: बायोपिक पाहून टेनिस क्रिकेटचा बाहशाह प्रवीण तांबेंच्या डोळ्यात आलं पाणी
Pravin Tambe Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:07 AM

क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांचा जीवनपट उलगडणारा ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) हा बायोपिक नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) प्रवीण तांबेंची भूमिका साकारली आहे. प्रवीण यांनी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघासोबत हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्याबद्दल भावना व्यक्त करताना प्रवीण यांना अश्रू अनावर झाले. केकेआरच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये प्रवीण तांबे हे केकेआर टीम आणि इतर स्टाफ मेंबर्ससोबत हा चित्रपट पाहताना दिसत आहेत. चित्रपट संपल्यानंतर ते काही शब्द बोलण्यासाठी उभे राहिले, पण भावना व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला.

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर या व्हिडिओमध्ये म्हणाला, “आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होतो आणि आज अखेर आम्हाला तो पाहायला मिळाला. चित्रपट पाहून आम्हीसुद्धा भावूक झालो, त्यातली गाणीही छान होती. शेवटी प्रवीण तांबे यांचं भाषण ऐकून मीसुद्धा भावूक झालो होतो.” वय हा केवळ आकडा आहे, ही म्हण प्रवीण तांबे यांना तंतोतंत लागू होते. वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून ‘इंडियन प्रीमिअर लीग’मध्ये (IPL) पदार्पण करणाऱ्या तांबेंनी हे दाखवून दिलं की, वयानुसार स्वप्नांची व्याख्या करता येत नाही.

पहा व्हिडीओ-

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

“बर्‍याच लोकांना माहित आहे की मी 41 वर्षांचा असताना पदार्पण केलं होतं, परंतु त्याआधी मी काय केलं हे त्यांना माहीतच नव्हतं. या चित्रपटाच्या माध्यमातून ते माझा संघर्ष पाहतील आणि मला जाणून घेतील अशी आशा आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण कधीही हार मानू नये, हे यातून त्यांना समजेल”, अशा शब्दांत प्रवीण तांबे व्यक्त झाले. 1 एप्रिल रोजी हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये श्रेयससोबतच आशिष विद्यार्थी, परम्ब्रता चॅटर्जी आणि अंजली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. जयप्रद देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा:

VIDEO: अंकिता लोखंडेने दिली ‘गुड न्यूज’? कंगनाच्या शोमध्ये उघड केलं गुपित

Lock Upp: सोशल मीडिया अॅपद्वारे लोकांकडून 50 लाख रुपये लुटले; प्रसिद्ध मॉडेलचा खुलासा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.