‘कलरफुल स्टार’ ट्विटवर विवेक अग्निहोत्रीची पलटी, तो रणवीर सिंह नाही तर मग कोण?

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या एका ट्विटची जोरदार सुरू आहे. चाहते या ट्विटचा वेगवेगळा अंदाज वर्तवत होते.

कलरफुल स्टार ट्विटवर विवेक अग्निहोत्रीची पलटी, तो रणवीर सिंह नाही तर मग कोण?
| Updated on: Oct 21, 2022 | 9:23 AM

मुंबई : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. अनेकदा यामुळे ते वादामध्येही अडकतात. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या एका ट्विटची (Tweet) जोरदार सुरू आहे. चाहते या ट्विटचा वेगवेगळा अंदाज वर्तवत होते. मात्र, यासर्व चर्चांना स्वत: विवेक अग्निहोत्री यांनी पूर्णविराम देत स्पष्टीकरण दिले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या ट्विटमुळे बाॅलिवूडमधील (Bollywood) अनेक स्टार नाराज होते. यावर विवेक अग्निहोत्री हे नेमके काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेऊयात.

इथे पाहा विवेक अग्निहोत्रीने केलेले ट्विट

विवेक अग्निहोत्रीने ट्विट करत म्हटले होते की, ‘कलरफुल स्टार’ला खराब चित्रपटांसाठी 10 पुरस्कार मिळाले आहेत. हे ट्विट विवेक यांनी रणवीर सिंहला उद्देशून केल्याचा अनेकांनी अंदाज बांधला होता. कारण बाॅलिवूडमध्ये कलरफुल स्टार म्हणून रणवीर सिंहची ओळख आहे. इतकेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून बेस्ट कलाकाराचे अनेक पुरस्कार हे रणवीरला मिळत आहेत. मात्र, असे नेमके काय घडले की, विवेक अग्निहोत्रीच्या निशाण्यावर रणवीर आला, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

आता या ट्विटच्या सर्व प्रकरणात विवेक अग्निहोत्रीने स्पष्टीकरण दिले आहे. रिपोर्ट्सनुसार, विवेक अग्निहोत्री म्हणाले की , रणवीर हा इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे, परंतू एखाद्याला चांगल्या अभिनयासाठी सन्मानित केले पाहिजे, जेव्हा कोणी काही करत नाही किंवा चांगला चित्रपट करत नाही तेंव्हा नाही. मात्र, हे मी स्पष्ट करू इच्छितो की मी हे सर्व रणवीर सिंहबद्दल अजिबात बोलत नाहीये.