Celina Jaitly | ‘बापलेकासोबत हिने..’; सेलिना जेटलीवर अत्यंत खालच्या पातळीची टीका; भडकली अभिनेत्री

सेलिनाने तिच्या उत्तरात ट्विटर सिक्युरिटीलाही टॅग केलं असून उमैर संधूविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती केली आहे. सेलिनाने 2011 मध्ये पीटर हाग याच्याशी लग्न केलं. या दोघांना 11 वर्षांची दोन जुळी मुलं आणि एक पाच वर्षांचा मुलगा आहे.

Celina Jaitly | बापलेकासोबत हिने..; सेलिना जेटलीवर अत्यंत खालच्या पातळीची टीका; भडकली अभिनेत्री
Feroz Khan, Celina Jaitly and Fardeen Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 12, 2023 | 8:51 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये एकेकाळी सक्रिय असणारी अभिनेत्री सेलिना जेटली आता चित्रपटांमध्ये फारशी दिसत नाही. मात्र तिने तिच्या करिअरमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सेलिना तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जायची. नुकतंच एका नेटकऱ्याने सेलिनाबद्दल अत्यंत खालच्या पातळीची टिप्पणी केली. त्यावर तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. सेलिनाने ट्रोलरला दिलेल्या या उत्तराची सध्या जोरदार चर्चा होत आहे. संबंधित युजरने सेलिनाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला होता. विशेष म्हणजे हा युजर स्वत:ला सेन्सॉर बोर्डाचा सदस्य आणि चित्रपट समीक्षक असल्याचं सांगतो. इतकंच नव्हे तर तो स्वत:ला बॉलिवूडच्या अडल्ट गॉसिपचा पत्रकारही म्हणवतो.

उमैर संधू असं या युजरचं नाव असून त्याने याआधीही बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. सहसा उमैरच्या ट्विट्सची दखल कोणी घेत नाही. मात्र त्याच्या टिप्पणीने सेलिना चांगलीच भडकली. सेलिनाबद्दल त्याने चुकीची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला म्हणून तिने बेधडक उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं.

उमैरने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं, ‘सेलिना ही अशी एकमेव अभिनेत्री आहे, जिचे पिता (फिरोज खान) आणि पुत्र (फरदीन खान) यांच्याशी शारीरिक संबंध होते.’ या ट्विटवर सेलिना भडकली आणि तिने उत्तर दिलं. सेलिनाने लिहिलं, ‘प्रिय संधू, अशा प्रकारची पोस्ट लिहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुरुष असण्यावर अधिक अभिमान वाटत असेल. तुम्हाला तुमच्या नपुंसकतेवरचा उपाय मिळाला असेल. पण तुमचा हा आजार डॉक्टरांच्या उपचारानेही बरा होऊ शकतो. कधीतरी प्रयत्न करून नक्की बघा. ट्विटरने यांच्याविरोधात त्वरित कारवाई करावी.’

सेलिनाने तिच्या उत्तरात ट्विटर सिक्युरिटीलाही टॅग केलं असून उमैर संधूविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती केली आहे. सेलिनाने 2011 मध्ये पीटर हाग याच्याशी लग्न केलं. या दोघांना 11 वर्षांची दोन जुळी मुलं आणि एक पाच वर्षांचा मुलगा आहे. सध्या ती पतीसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहते. सेलिना सध्या ग्लॅमरच्या विश्वापासून दूर आपल्या खासगी आयुष्यात मग्न आहे.