
बॉलिवूडपासून साउथ चित्रपटसृष्टीपर्यंत आजकाल मोठे सुपरस्टार्स एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात. कोणी 100 कोटी रुपये, तर कोणी 200 किंवा 250 कोटी रुपये फी घेत आहे. पण 90 च्या दशकात अभिनेत्यांना आजच्या फीच्या तुलनेत अगदीच कमी फी मिळायची. त्या काळात मोठमोठ्या अभिनेत्यांची फी सुद्धा लाखोंमध्ये असायची. तरीही त्या काळात एक अभिनेता असा होता जो 1 कोटी रुपये फी घ्यायचा.
हा अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीतून नाही. कन्नड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीशीही त्याचा संबंध नाही. हा अभिनेता दुसरा कोणी नसून तेलुगू चित्रपटसृष्टीचा मेगास्टार चिरंजीवी आहे. तेलुगू सिनेमातील मोठ्या स्टार्सपैकी एक असलेले चिरंजीवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केलं आहे. एकेकाळी त्यांनी फीच्या बाबतीत अमिताभ बच्चन यांच्यासह सर्व दिग्गज अभिनेत्यांना मागे टाकलं होतं.
वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…
1 कोटी फी घेणारा पहिला सुपरस्टार
चिरंजीवी यांनी तेलुगू सिनेमात अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. आंध्र प्रदेशातील मोगाल्तुरु येथे 22 ऑगस्ट 1955 रोजी चिरंजीवी यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव कोनिदेला शिव शंकर वरप्रसाद आहे. पण नंतर त्यांनी आपलं नाव बदललं. त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी आपल्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट ‘पुनाधिरल्लू’ हा 1978 मध्ये प्रदर्शित झाला. पण त्यांना खरी ओळख ‘मनावुरी पांडवुलु’ या चित्रपटातून मिळाली. तर 1983 मध्ये आलेल्या ‘खैदी’ चित्रपटाने ते स्टार बनले.
70 वर्षीय अभिनेत्याने 80 आणि 90 च्या दशकात तेलुगू सिनेमात एक वेगळं आणि मोठं स्थान मिळवलं होतं. 90 च्या दशकापर्यंत त्यांना सुपरस्टारचा दर्जा मिळाला होता. त्या काळात हा अभिनेता एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये फी घ्यायचा. अमिताभ बच्चन यांनीही चिरंजीवी यांच्यानंतरच इतकी फी घ्यायला सुरुवात केली होती.
1650 कोटींपेक्षा जास्त संपत्ती
चिरंजीवी यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीत ‘स्वयंकृषि’, ‘कोंडवीटी डोंगा’, ‘गैंग लीडर’, ‘घराना मोगुडु’, ‘हिटलर’, ‘मुथा मेस्त्री’, ‘स्नेहम कोसम’, ‘पसिवाड़ी प्राणम’, ‘रुद्रवीणा’, ‘यमुडिकी मोगुडु’, ‘जगदेकवीरुडु अतिलोकसुंदरी’, ‘चूडालानी वुंडी’, ‘अन्नाय्या’, ‘इंद्र’, ‘ठागूर’, ‘शंकरदादा एमबीबीएस’ यासारखे अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. ते आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांच्या संपत्तीचा विचार केला तर हा अभिनेता 1650 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.