AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Arjun सिनेमाच्या सेटवर तरुणींची छेडछाड… काय करायचे सलमान, शाहरुख खान? दिग्दर्शकाकडून पोलखोल

Karan Arjun Film : 'करण अर्जुन' सिनेमाच्या सेटवर तरुणींसोबत काय व्हायचं, गावात सलमान खान, शाहरुख खान काय करायचे? दिग्दर्शकाकडून पोलखोल... सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा...

Karan Arjun सिनेमाच्या सेटवर तरुणींची छेडछाड... काय करायचे सलमान, शाहरुख खान? दिग्दर्शकाकडून पोलखोल
फाईल फोटो
| Updated on: Nov 03, 2025 | 1:53 PM
Share

Karan Arjun Film : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता सलमान खान स्टारर ‘करण अर्जुन’ सिनेमा बॉलिवूडच्या आकॉनिक सिनेमांपैकी एक आहे. सिनेमातील सीन, डायलॉग आणि गाणी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कोरियोग्राफर चिन्नी प्रकाश याने सिनेमातील काही आठवणी ताज्या केल्या. सिनेमाची शुटिंग सुरु असताना गावतल्या काही पुरुषांनी सेटवर तरुणींची छेड काढली होती. तेव्हा त्यांच्या मदतीला सलमान आणि शाहरुख धावून आले होते.

राजस्थानच्या ग्रामीण भागात ‘भांगडा पाले’ या गाण्याच्या शूटिंगची आठवण चिन्नीने सांगितली. मुलाखतीत चिन्नी म्हणाला, ‘हे एक मोठं गाणं होतं कारण दोन्ही अभिनेते एकत्र डान्स करत होते आणि दोघे देखील उभरते स्टार होते… शुटिंग सुरु असताना गावातील काही मुलांनी सेटवर मुलींचे छेड काढली. तेव्हा तरुणींच्या मदतीसाठी शाहरुख आणि सलमान खान आले होते. मोठं भांडणं देखील झालं होतं. तेव्हा मी आणि शाहरुखने मुलींना व्हॅनमधून हॉटेलमध्ये आणलं होतं…’

नशेत सेटवर यायचे सलमान आणि शाहरुख खान

त्यावेळी सेटवर मद्यपानाबद्दल बोलताना चिन्नी प्रकाश म्हणाले, ‘आम्ही सर्वजण एका गेस्ट हाऊसमध्ये राहायचो आणि त्याच्या टेरेसवर रिहर्सल करायचो. राकेश रोशन (सिनेमाचे दिग्दर्शक) दररोज सर्वजण रिहर्सलला येतील याची खात्री करायचे. रिहर्सलला येण्यापूर्वी दोघेही दारू पित असत आणि रिहर्सल सकाळपर्यंत चालत असे.’

‘करण अर्जुन’ सिनेमा

‘करण अर्जुन’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 13 जानेवारी 1995 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. तेव्हा चाहत्यांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं.. ‘करण अर्जुन’ सिनेमानंतर अनेक सिनेमांत दोघांनी दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

सलमान खान आणि शाहरुख खान 

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. आजही चाहत्यांमध्ये दोघांची क्रेझ पाहायला मिळेत. चाहते कायम दबंग खान आणि किंग खान यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान लवकरच ‘किंग’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री सुहाना खान पहिल्यांदा वडिलांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.  तर सलमान खान ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.