
फिल्मी कलाकारांच्या वाट्याला कधी चांगले तर कधी वाईट अनुभव येतच असतात. कधी चाहत्यांमुळे तर कधी स्वत:च्या अतिघाईमुळे हे कलाकार अडचणीत येतात. अभिनेता चंकी पांडे याच्या वाट्यालाही असाच एक किस्सा आला आहे. चंकीला विमानतळावर पोलिसांनी पकडलं. पकडण्यात घेण्यामागचं कारणही तसंच होतं. चंकीने पोलिसांना समजावून सांगण्याचा अटोकाट प्रयत्न केला. सांगून सांगून थकला. पण काहीच उपयोग झाला नाही. नंतर मात्र अचानक…
अक्षय कुमारचा हाऊसफुल 5 हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात एकूण 19 कलाकारांनी काम केलंय. ज्या गोष्टीसाठी हाऊसफुल ओळखली जाते, त्या सर्व गोष्टी या सिनेमात आहेत. म्हणजे मोठी स्टारकास्ट, लॅविश सेट्स आणि स्लॅपस्टिक कॉमेडी. या सिनेमात काही नवीन तर काही जुने अभिनेतेही आहे. म्हणजे नाना पाटेकर, रितेश देशमुख, अक्षय कुमार, जॅकलीन, जॉनी लिव्हर आणि चंकी पांडे अशी जुन्या नव्या कलाकारांची भट्टी या सिनेमात जमली आहे. चंकी तर या सिनेमात सुरुवातीपासूनच आहे. त्याचं आखिरी पास्ता हे कॅरेक्टर तुफान हिट झालं आहे.
चंकी आणि हाऊसफुल फ्रेंचाइजचं नातं जुनच आहे. म्हणजे 2010 पासून आहे. जेव्हापासून हाऊसफुल सिनेमा बनला तेव्हापासून चंकी या सिनेमाचा एक भाग राहिला आहे. हाऊसफुलने त्याला नवीन ओळख दिली आहे. पण एकदा त्याला या सिनेमामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता. हाऊसफुलमुळे चंकी मॉस्कोच्या तुरुंगात जाता जाता वाचला होता. हा किस्सा अफलातून आहे.
चंकी शुटिंग संपवून अॅमस्टरडॅम विमानतळावर आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चंकी ड्रग्स पेडलर असल्याचं पोलिसांना वाटलं. चंकीचा लूक तसाच होता. तो सेटवरून थेट विमानतळावर गेला होता. त्यामुळे त्याने मिश्या काढल्या नव्हत्या. मेकअप तसाच ठेवला होता. पण पोलिसांना मात्र तो गेटअप पाहून तो क्रिमिनल असल्याचं वाटलं आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं. पकडल्यावर पोलिसांना समजता समजता चंकी थकला होता. मी इंडियातील एक मोठा अभिनेता आहे, असं तो वारंवार पोलिसांना सांगत होता. पण पोलीस मात्र काहीही ऐकायला तयार नव्हते.
चंकीने पोलिसांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. युट्यूबवरचे त्याचे व्हिडीओही त्याने दाखवले. पण पासपोर्टवर त्याचं असली नाव सुयश पांडे लिहिलेलं होतं. मिशीही लावलेली होती. त्यामुळे पोलिसांना त्याचं म्हणणं पटत नव्हतं. त्यानंतर चंकीने विमानतळावर असलेल्या अनेक भारतीयांशी संवाद साधला. आपण चंकी पांडे आहोत हे पोलिसांना सांगण्याची त्याने विनंती केली. पण त्याच्या लूकमुळे भारतीयांनीही त्याला ओळखलं नाही. त्यामुळे चंकीला चांगलंच टेन्शन आलं होतं. मात्र, एक म्हातारी पुढे आली आणि तिने चंकी पांडेला ओळखलं. हा मोठा अभिनेता आहे. शुटिंगसाठी त्याने असा वेश केल्याचं त्या महिलेने सांगितल्यावर मात्र पोलिसांना पटलं आणि त्यांनी चंकीला सोडून दिलं.