
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणं सादर केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा चर्चेत आला होता. या प्रकरणी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कुणाल कामरा हा सतत चर्चेत आहे. आता कुणाल कामराने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला असल्याचे म्हटले जात आहे.
काय आहे कामराची पोस्ट?
कुणाल कामराने सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर नवी पोस्ट केली आहे. त्याने ही पोस्ट थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केली आहे. ‘माझी औकात नसेल तर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा. माझी औकात नाही, माझा शो 4 लोकं बघत नसतील तर कृपया माझ्याकडे दुर्लक्ष का करत नाही? ऑक्टोबर महिन्यात मी नाशिक, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये शो घेणार लवकरच मी महाराष्ट्रात स्टँडअप कॉमेडी शो घेणार’ या आशयाची पोस्ट कुणालने केली आहे.
Video: कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत नको ते करत होती… पती आला, सिंदूर पुसलं आणि नंतर…
Hello @Dev_Fadnavis you’re right,
Politically it’s better to ignore me.
I have no Aukad & only 4 people watch my show. Please can I be ignored?
October I was planning shows in
Thane – New Mumbai – Mumbai –
Pune – Nasik – Nagpur – Aurangabad
Please coordinate with Mr Shinde… pic.twitter.com/1yyho9Wtef— Kunal Kamra (@kunalkamra88) May 29, 2025
नेटकऱ्यांनी दिले उत्तर
कुणाल कामराच्या व्हायरल झालेल्या पोस्टला देवेंद्र फडणवीस यांच्या फॅनपेजने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. ‘प्रत्येक वेळी निवडणुका जवळ येतात, तेव्हा तुमचे शो राजकीय रॅलीत बदलतात. प्रेक्षकांमध्ये 4 लोक, पण लक्ष वेधण्यासाठी 400 ट्विट्स. तुम्हाला दुर्लक्षित केलं जात नाही— तुम्ही फक्त महत्त्वाचे नाहीत’ असे म्हटले आहे. तर काही यूजरने त्याला शो रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबईतील एका शोदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटल्याने कामराविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. ज्या ठिकाणी हा शो झाला होता, तिथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली होती. या शोदरम्यान कामराने ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील एका गाण्याची नक्कल करून त्यात शिंदेंना ‘गद्दार’ म्हटलं होतं.