Video: कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत नको ते करत होती… पती आला, सिंदूर पुसलं आणि नंतर…
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पतीने पत्नीला प्रिकरासोबत रंगेहात पकडले आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर असल्याचे समजते. तो तिला प्रियकरासोबत रंगेहात पकडतो. त्यानंतर तो आपल्या पत्नीच्या कपाळावरील सिंदूर पुसून टाकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक लाल रंगाची चारचाकी गाडी दिसत आहे. या गाडीमध्ये एक विवाहित जोडपे बसलेले दिसत आहे. ड्रायव्हिंग सीटवर एक तरुण आहे, तर त्याच्याशेजारी एक महिला बसलेली दिसते. तेवढ्यात एक व्यक्ती गाडीजवळ येतो आणि त्या महिलेला गाडीतून बाहेर काढते. तिला एका बाजूला घेऊन जाते. व्हिडीओत त्या महिलेचा कथित प्रियकरही तेथे उभा असल्याचे दिसत आहे. त्यानंतर, त्या महिलेचा पती एका भांड्यात पाणी घेऊन तिच्याजवळ जातो. तेव्हा ती महिला त्याचा हात पकडते. वाचा: सुंदर काकीच्या प्रेमात दोन पुतणे, नवऱ्याने नको त्या अवस्थेत पकडलं अन्… कळल्यावर पोलिसांचाही घाम फुटला
Extra-Marital affair Kalesh (Husband Caught his wife with someone else’s, Gave perfect treatment 🫡) pic.twitter.com/nOSj99ysEX
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 21, 2025
पुढे, या पुरुषाने त्या महिलेच्या कपाळावरील सिंदूर पाण्याने फुसले आहे. त्यानंतर तो तेच सिंदूर तिच्या कथित प्रियकराला देतो आणि तो प्रियकर ते सिंदूर महिलेच्या कपाळावर लावतो. दरम्यान ती महिला लाजून इकडे-तिकडे पाहते आणि आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न करते.
व्हिडीओबाबत काय सांगितले जात आहे?
असे म्हटले जात आहे की, त्या महिलेला तिच्या प्रियकरासोबत जाताना तिच्या पतीने रंगेहाथ पकडले. मात्र, तिला पकडणारी व्यक्ती खरंच तिचा पती आहे की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर असे व्हिडीओ का व्हायरल होतात?
अनेकदा प्रसिद्धीसाठी किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी असे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. यामुळे संबंधित व्यक्तींना फायदा होतो. मात्र, या व्हिडीओच्या सत्यतेबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. यापूर्वीही असेच काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये पती आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देताना दिसतो.
