Javed Akhtar | कंगना रनौतवर निशाणा साधणं जावेद अख्तर यांना पडलं महागात; कोर्टाकडून समन्स जारी

कंगना हिने केलेल्या तक्रारीप्रकरणी न्यायालयाने जावेद अख्तर यांना बजावला समन्स, अभिनेत्रीवर निशाणा साधणं जावेद अख्तर यांना पडलं महागात, सध्या सर्वत्र दोघांच्या वादाची चर्चा..

Javed Akhtar | कंगना रनौतवर निशाणा साधणं जावेद अख्तर यांना पडलं महागात; कोर्टाकडून समन्स जारी
| Updated on: Jul 25, 2023 | 7:55 AM

मुंबई | 25 जुलै 2023 : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिचा अपमान आणि धमकावल्या प्रकरणी कोर्टाने जावेद अख्तर यांना समन्स बजवला आहे. महानगरदंडाधिकारी यांनी सोमवारी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात फौजदारी कारवाई सुरू केली. याप्रकरणी न्यायालयाने अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. सध्या सर्वत्र जावेद अख्तर आणि कंगना रानौत यांच्यामध्ये असलेल्या वादाची चर्चा सुरु आहे.

२०२१ मध्ये झालेल्या एका मुलाखतीनंतर कंगना रनौत हिने जावेद अख्तर यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. मुलाखतीत  जावेद अख्तर आपल्याला धमकावत असल्याचा आणि अभिनेता हृतिक रोशनची माफी मागण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत आहेत.. असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं होतं. तेव्हा हृतिक आणि कंगना त्यांच्या काही ई-मेलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

फक्त कंगना हिनेच नाही तर जावेद अख्तर यांनी देखील कंगनाविरोधात बदनामीप्रकरणी फौजदारी तक्रार नोंदवली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर एका मुलाखतीत कंगना हिने अख्तर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती. आता हे प्रकरण कायद्याच्या कचाटात्यात अडकलं आहे.

कंगना हिने केलेल्या या तक्रारीप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी जावेद अख्तर यांना समन्स बजावला आहे. तर ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र जावेद अख्तर आणि कंगना रनौत यांच्यामध्ये असणाऱ्या वादाची चर्चा रंगत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर कंगना हिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. एवढंच नाही अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कंगना तुफान चर्चेत आली. आज दोघांचे मार्ग वेगळे झाले असले तरी, वाद मात्र कायम आहेत.

वादग्रस्त मुद्द्यांवर स्वतःचं परखड मत मांडत अभिनेत्री कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. एवढंच नाही तर, बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रिटींबद्दल मोठं वक्तव्य अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असते. कायम वादाचा मुकूट घेवून मिरवणारी कंगना आता पुन्हा चर्चेत आली आहे.