Daler Mehndi : दलेर मेहंदी एका कॉन्सर्टसाठी किती रुपये घेतात? नेटवर्थचा आकडाही थक्क करणारा!
उत्तराखंडच्या नवीन टिहरीत मां कुंजापुरी मेळ्याच्या दरम्यान लोकप्रिय गायक दलेर मेहंदी वादात सापडले आहेत. चला पाहूया, एका शोसाठी ते किती फी घेतात?

गेल्या अनेक दशकांपासून दमदार आवाज आणि ठेका धरायला मजबूर करणारी गाणी गाणारे, पहाडी आवाजाच गायक म्हणजे दलेर मेहंदी. त्यांनी शानदार गाण्यांनी लाखो लोकांचे हृदय जिंकलं आहे. मात्र उत्तराखंडमधील नई टिहरी येथे आयोजित करण्यात आलेल्या माँ कुंजापुरी मेळ्यातील एका प्रकारामुळे ते चर्चेत आले आहेत. दलेर मेहंदी लाईव्ह परफॉर्मन्सवरून वाद निर्माण झाल्यानंतर मनोरंजनविश्वात याची जोरदार चर्चा सुरू झाली. या प्रकरणात उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यानंतर गायक मीका सिंह यांनी दलेर मेहंदी यांच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ शेअर केला. कपिल शर्मा, शान, अनुपम खेर आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या सेलिब्रिटींनीही त्यांना पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. या सगळ्या चर्चेदरम्यान दलेर मेहंदी एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेतात आणि त्यांची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊया.
दलेर मेहंदी एका शोसाठी किती घेतात मानधन ?
दलेर मेहंदी हे त्यांच्या दमदार आवाजासाठी आणि उत्साही लाईव्ह परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका लाईव्ह शो किंवा कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करण्यासाठी ते साधारण 35 ते 40 लाख रुपये मानधन घेतात.
तर उत्तराखंडच्या टिहरी येथे झालेल्या माँ कुंजापुरी मेळ्यातील कार्यक्रमासाठी त्यांना 35 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी ANI शी बोलताना या मानधनाचा उल्लेख केल्याचे वृत्त आहे. मात्र, कलाकारांचे मानधन कार्यक्रमाचे स्वरूप, कालावधी आणि इतर अटींनुसार बदलू शकते.
किती आहे नेटवर्थ ?
दलेर मेहंदी यांनी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीतून मोठी लोकप्रियता आणि संपत्ती कमावली आहे. MoneyMint च्या वृत्तानुसार, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 124 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटासाठी एक गाणे गाण्याकरिता ते सुमारे 6 लाख रुपये मानधन घेतात.
दलेर मेहंदी यांचं करिअर
दलेर मेहंदी यांनी 1995 मध्ये ‘बोलो ता रा रा’ या आपल्या पहिल्या अल्बममधून संगीतविश्वात दमदार पदार्पण केलं. या अल्बमला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ते घराघरांत पोहोचले.भांगडा आणि इंडी-पॉप संगीताला लोकप्रिय करण्यात दलेर मेहंदी यांचे मोठे योगदान आहे. ‘तुनक तुनक तुन’ या गाण्याने त्यांना भारतासह परदेशातही मोठी ओळख मिळवून दिली. याशिवाय त्यांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. आपल्या खास आवाजामुळे आणि ऊर्जेने भरलेल्या सादरीकरणामुळे दलेर मेहंदी यांनी संगीतविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. सध्या माँ कुंजापुरी मेळ्यातील त्यांच्या कार्यक्रमावरून सुरू झालेल्या चर्चेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.