घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिनेत्रीने केले पतीला अनफाॅलो, फोटो डिलीट करत आता..

गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड कलाकारांचे घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहेत. सतत काही कलाकारांचे घटस्फोट होताना दिसत आहेत. गेल्याच वर्षी दलजीत कौर हिने दुसऱ्यांदा लग्न केले. आता दलजीत कौर ही तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अभिनेत्रीने केले पतीला अनफाॅलो, फोटो डिलीट करत आता..
| Updated on: Feb 16, 2024 | 3:13 PM

मुंबई : अभिनेत्री दलजीत कौर ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतंय. दलजीत कौर हिने गेल्याच वर्षी बिझनेस मॅन निखिल पटेल याच्यासोबत दुसऱ्यांदा लग्न केले. निखिल पटेल याच्यासोबतच्या लग्नानंतर थेट विदेशात दलजीत कौर ही शिफ्ट झाली. निखिल पटेल याचे देखील हे दुसरेच लग्न आहे. निखिल पटेल याला पहिल्या पत्नीकडून दोन मुली आणि दलजीत कौर हिला देखील एक मुलगा आहे. हे सर्वजण केन्यात राहतात. दलजीत कौर ही तिच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर सतत शेअर करताना दिसली.

धमाकेदार पद्धतीने दलजीत कौर हिचे लग्न भारतात पार पडले. 18 मार्च 2023 रोजी दलजीत कौरने निखिल पटेलसोबत लग्न केले. आता काही दिवसांपूर्वीच दलजीत कौर ही भारतामध्ये परतली आहे. हेच नाही तर यावेळी तिचा मुलगा देखील तिच्यासोबत आलाय. दलजीत कौर ही भारतामध्ये परतल्यानंतर विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. चाहतेही हैराण झालेत.

हेच नाही तर दलजीत कौर आणि निखिल पटेल यांनी इंस्टावरून एकमेकांचे फोटो डिलीट केले आहेत. हैराण करणारे म्हणजे निखिल पटेल आणि दलजीत कौर यांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफाॅलो देखील केले आहे. यामुळे विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. दलजीत कौर आणि निखिल पटेल यांचा वाद टोकाला गेल्याचे देखील सांगितले जात आहे.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये दलजीत कौर हिने थेट सांगितले की, ती आता परत एकदा अभिनय क्षेत्रामध्ये परतणार आहे. मालिकेत देखील काम करण्याची इच्छा तिने थेट व्यक्त केलीये. म्हणजेच काय तर आता दलजीत कौर ही विदेशात जाणार नाहीये. मात्र, दलजीत कौर ही तिच्या घटस्फोटावर बोलणे सातत्याने टाळताना दिसत आहे.

दलजीत कौर ही सध्या कामाच्या शोधात आहे. दलजीत कौर हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. मात्र, असे असताना देखील याबद्दल बोलताना सातत्याने टाळताना दलजीत कौर ही दिसत आहे. दलजीत कौर आणि निखिल पटेल हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. आता काही दिवसांमध्ये दलजीत कौर आणि निखिल यांच्या नात्याबद्दल खुलासे होऊ शकतात.