
26/11 Terror Attack : सोशल मीडियावर सोशल मीडियास्टार ‘Day 1 as spy इन पाकिस्तान’ यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत. सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमाच्या पार्श्वभूमीवर ‘Day 1 as spy इन पाकिस्तान’ असा ट्रेंड सुरू झाला आहे. यावर अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, यावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने संताप व्यक्त केलेला. तर अभिनेता आयुष साळुंके याने देखील एक व्हिडीओ पोस्ट करत कसाबला जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांची आठवण करु दिली आहे.
आयुष संजीव याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याला कोणातरी विचारलं की, ‘नाम क्या है…’ यावर आयुष याने स्वतःचे नाव न घेता तुकाराम ओंबळे यांचं नाव घेत म्हणाला, ‘तुकाराम ओंबळे… बरोबर ऐकलं तुकाराम ओंबळ…’ ट्रेंड सुरु होता म्हणून म्हटलं आपण देखील हात धुवून घ्यावा… ‘हमजा अली मजारी’ हे फिक्शनल कॅरेक्टर आपण फेमस करतोय…त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. पण, तुकाराम ओंबळे….
तुकाराम ओंबळे यांच्याबद्दल अभिनेता पुढे म्हणाला, ‘तुकाराम ओंबळे आपले खरे हिरो… ज्यांनी अजमल कसाब याला पकडलं… आमच्या महाराष्ट्राचा मावळा तुकाराम ओंबळे… हातात फक्त एक काठी… छातीवर – पोटात गोळ्या खात असताना देखील कसाब याला सोडलं नाही…’
‘आज अजमल कसाब याचं नाव जगाला माहिती आहे. पण तुकाराम ओंबळे यांचं नाव फार कमी लोकांना माहिती आहे… म्हणूनच मला सांगायचं आहे की, तुकाराम ओंबळे साहेब…तुमचे पराक्रम आणि नाव आम्ही कोणाला विसरू देणार नाही. जय हिंद…जय महाराष्ट्र…’ असं देखील अभिनेत पोस्टच्या शेवटी म्हणाला आहे…
व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘नाम भुलना नही…’ असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील अभिनेता आयुष साळुंके याची पोस्ट आवडली आहे. अनेकांनी पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.