डिलिव्हरीच्या सात महिन्यांतच डेबिना दुसऱ्यांदा झाली आई; सोनू सूदकडून शुभेच्छा

तारखेच्या आधी डेबिनाच्या बाळाचा जन्म; गुरमीतकडून चाहत्यांना विनंती

डिलिव्हरीच्या सात महिन्यांतच डेबिना दुसऱ्यांदा झाली आई; सोनू सूदकडून शुभेच्छा
Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 11, 2022 | 3:55 PM

मुंबई- टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री डेबिना बॅनर्जीने 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. पती आणि अभिनेता गुरमीत चौधरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. तारखेच्या आधी बाळाचा जन्म झाल्याचंही त्याने या पोस्टमध्ये सांगितलंय. त्याचप्रमाणे चाहत्यांनी आपल्याला काही वेळ द्यावा, अशीही विनंती त्याने केली. गुरमीतच्या या पोस्टवर सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

‘दोघांना खूप खूप शुभेच्छा. मलासुद्धा चिमुकली मुलगी पाहिजे’, अशी मजेशीर कमेंट कॉमेडियन भारती सिंगने केली. तर अभिनेता सोनू सूदनेही कमेंट करत डेबिना-गुरमीतला शुभेच्छा दिल्या आहेत.

डेबिना आणि गुरमीत यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. 2008 मध्ये ‘रामायण’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या मालिकेत गुरमीतने राम तर डेबिनाने सीतेची भूमिका साकारली होती.

डेबिना आणि गुरमीतच्या आयुष्यात याच वर्षी एप्रिल महिन्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर लगेच डेबिनाने दुसऱ्या प्रेग्नन्सीची माहिती चाहत्यांना दिली. त्यावरून अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र जुळी मुली ज्यांना होतात, ते काय करत असतील, असा सवाल डेबिनाने ट्रोलर्सना केला.

पहिल्या मुलीच्या जन्माच्या सात महिन्यांतच डेबिनाने दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. याचसाठी गुरमीतने त्याच्या पोस्टमध्ये चाहत्यांना त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती केली.

डेबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.