‘तिला वेदना होतायत…’ , दीपिका कक्कडवर14 तास कॅन्सरची शस्त्रक्रिया; पती शोएबने सांगितली अभिनेत्रीची परिस्थिती

दीपिका कक्कडवर तब्बल 14 तास कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली. पती शोएब इब्राहिमने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. दीपिका सध्या आयसीयूमध्ये आहे. शोएबने चाहत्यांच्या पाठिंब्यासाठी आभार मानले आहेत.

तिला वेदना होतायत... , दीपिका कक्कडवर14 तास कॅन्सरची शस्त्रक्रिया; पती शोएबने सांगितली अभिनेत्रीची परिस्थिती
Deepika Kakkar underwent 14-hour cancer surgery
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2025 | 4:19 PM

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड बऱ्याच दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत आहे. अनेकांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. आता तिची कॅन्सरची शस्त्रक्रिया झाली आहे. दीपिकाचे चाहते तिच्या प्रकृतीबद्दल खूप चिंतेत होते. जेव्हा शोएबने अभिनेत्रीची शस्त्रक्रिया कधी होणार आहे हे सांगितले तेव्हापासून चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत होते. आता शोएब इब्राहिमने एक पोस्ट शेअर करून दीपिकाच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे. त्याने दीपिकाच्या आरोग्याची अपडेट दिली आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट करत शोएबने दिली दीपिकाच्या शस्त्रक्रियेबद्दल अपडेट

शोएब इब्राहिमने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे आणि दीपिकाच्या शस्त्रक्रियेबद्दल अपडेट दिले आहे. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “सर्वांना नमस्कार, मला माफ करा, काल रात्री मी तुम्हाला सर्वांना अपडेट देऊ शकलो नाही. ही खूप लांब शस्त्रक्रिया होती. ती 14 तास ओटीमध्ये होती. पण सर्व काही ठीक आहे. दीपी सध्या आयसीयूमध्ये आहे कारण तिला काही वेदना होत आहेत पण ती स्थिर आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी, प्रार्थनांसाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. ती आयसीयूमधून बाहेर पडल्यानंतर मी तुम्हाला सर्वांना अपडेट देईन. पुन्हा एकदा धन्यवाद. तिला तुमच्या प्रार्थनेत ठेवा.” असं म्हणत त्याने चाहत्यांचे आभारही मानले.

शस्त्रक्रिया 14 तास चालली

सोमवारी, शोएबने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये दीपिकावर मंगळवारी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती त्याने दिली होती. शोएबने सांगितले होते की ही शस्त्रक्रिया बराच वेळ चालणार असल्याचं त्याने सांगितले होते. त्यानुसार ही शस्त्रक्रिया 14 तास चालली.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर चाहत्यांना दीपिकाच्या तब्येतीची अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता 

दीपिकाच्या यकृतात टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर होता. हा ट्यूमर दुसऱ्या टप्प्यातील कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं. डॉक्टर तिच्या शस्त्रक्रियेची वाट पाहत होते पण दीपिकाला फ्लू झाला होता ज्यामुळे तिची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. शोएबने त्याच्या व्लॉगमध्ये दीपिकाच्या लिव्हरच्या ट्यूमरबद्दल सर्वप्रथम माहिती दिली. दीपिकाच्या कॅन्सरची माहिती मिळाल्यावर दीपिका देखील व्लॉगवर आली आणि चाहत्यांना तिच्या तब्येतीबद्दल सांगितले होते. पण आता तिची शस्त्रक्रिया झाल्यानंतर चाहत्यांना तिच्या तब्येतीची अपडेट जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता आहे.