अखेर दीपिका पादुकोण हिने केला रणबीर कपूरसोबतच्या नात्याबद्दल थेट मोठा खुलासा, म्हणाली, माझे आयुष्य…

दीपिका पादुकोण हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. दीपिका पादुकोणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. दीपिका पादुकोणने मोठा खुलासा केला.

अखेर दीपिका पादुकोण हिने केला रणबीर कपूरसोबतच्या नात्याबद्दल थेट मोठा खुलासा, म्हणाली, माझे आयुष्य...
deepika padukone and ranbir kapoor
| Updated on: Jul 26, 2024 | 2:24 PM

अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. दीपिका पादुकोण ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पादुकोणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपट चांगलेच धमाका करत आहेत. लवकरच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे आपल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. दीपिका पादुकोण ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला पोहोचली होती. यावेळी दीपिकाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत होता. दीपिका पादुकोण ही लग्नाच्या सात वर्षांनंतर बाळाला जन्म देत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी आम्ही लवकरच आई बाबा बनणार असल्याची पोस्ट शेअर केली.

दीपिका पादुकोण ही तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिलेली आहे. रणवीर सिंह याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर दीपिका पादुकोण ही रणबीर कपूर याला डेट करत होती. हेच नाहीतर दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर हे लग्न करणार असल्याचीही जोरदार चर्चा होती.

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरची पहिली भेट ही चित्रपटाच्या सेटवरच झाली. रणबीर कपूर याच्या आयुष्यात कतरिना कैफ ही आली आणि तिच्यामुळेच यांचे ब्रेकअप झाल्याचे देखील सांगितले जाते. करण जोहर याच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण ही आली होती, यावेळी दीपिका पादुकोण हिने थेट सांगितले की, रणबीर कपूर याच्यासोबतचे ब्रेकअप तिच्यासाठी किती जास्त कठीण होते.

दीपिका पादुकोण म्हणाली की, माझ्यासाठी हे ब्रेकअप नक्कीच सोपे नव्हते, हे नाते माझ्यासाठी माझे आयुष्य बनले होते. मी शहरात नवीन होते. तो माझा मित्र झाला. मी त्यावेळी माझे जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाही. ते नाते संपल्यावर खरच खूप काही शिकवले. यामुळे आज मी एक चांगली व्यक्ती बनले आहे. 

कतरिना कैफ ही आयुष्यात आल्यानंतर रणबीर कपूर याने दीपिका पादुकोण हिला धोका दिला. हा धक्का दीपिका पादुकोण हिच्यासाठी मोठा आहे. काही वर्षे दीपिका पादुकोण हिला या धक्क्यातून निघण्यासाठी लागले. कतरिना कैफ हिच्यासोबत डेट केल्यानंतर रणबीर आणि कतरिना यांचेही ब्रेकअप झाले. रणबीर कपूर याने 14 एप्रिल रोजी आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केले.