कोणी केला होता रश्मिका मंदाना हिचा नको तो व्हिडीओ व्हायरल? पोलिसांकडे मोठे पुरावे, आरोपींना होणार अटक

Rashmika Mandanna | रश्मिका मंदाना हिच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई... अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माजली होती सर्वत्र खळबळ... पोलिसांकडून कसून चौकशी सुरु... लवकरच होणार आरोपींना होणार अटक...

कोणी केला होता रश्मिका मंदाना हिचा नको तो व्हिडीओ व्हायरल? पोलिसांकडे मोठे पुरावे, आरोपींना होणार अटक
| Updated on: Nov 24, 2023 | 11:00 AM

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : डीपफेक व्हिडीओंच्या प्रकरणात देशात मोठी वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचे व्हिडीओ डीपफेक करून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. डीपफेक व्हिडीओ प्रकरणी पोलीस देखील सावध झाले असून कसून चौकशी करत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून चर्चांना उधाण आलं आहे. याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मिका मंदाना हिच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी तपासात आवश्यक पुरावे सापडले असून तांत्रिक विश्लेषणाद्वारे पुढील चौकशी केली जात आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘तांत्रिक अधिकारी सर्व आयपी पत्ते ओळखून नक्की कोणत्या ठिकाणाहून व्हिडीओ अपलोड करण्यात आला याची तपासणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी सर्वत्र प्रथम व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट केला याची देखील कसून चौकशी होत आहे.’ सध्या सर्वत्र व्हिडीओच्या चौकशीची चर्चा रंगली आहे.

पोलिस उपायुक्त हेमंत तिवारी म्हणाले त्यांना आवश्यक लीड्स मिळाले आहेत आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल.. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवल्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी, दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) ने या प्रकरणाच्या संबंधी अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. रश्मिका हिने धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी देखील व्यक्त केली होती.. ‘जे घडतंय ते अत्यंत धोकादायक आहे…’ असं अभिनेत्री म्हणाली होती..

अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील लवकरत लवकर दोषींवर कारवाई करा… असं वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. तेव्हा बिग बी यांची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल झाली होती.

रश्मिका मंदाना हिचा आगामी सिनेमा

रश्मिका मंदाना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री लवकरच ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्य प्रतीक्षेत आहेत.