Devon Ke Dev Mahadev: मी बिकिनी घालेल, कोणाच्या बापाचं काय…, ‘महादेव’ फेम अभिनेत्री कोणावर भडकली!
Devon Ke Dev Mahadev: 'देवों के देव... महादेव' मालिकेतील अभिनेत्री सोनारिका भदोरिया सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. 'मी बिकिनी घालेल, कोणाच्या बापाचं काय...', असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं असून की असं का म्हणाली जाणून घ्या...

Devon Ke Dev Mahadev: अभिनेत्री सोनारिका भदोरिया हिने ‘देवों के देव… महादेव’ या मालिकेत महत्त्वाची भूमिकेत पार्वती ही भूमिका साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. चाहते देखील अभिनेत्रीला तिच्या नावाने नाहीतर ‘पार्वती’ याच नावाने ओळखू लागलेले. अध्यात्मिक मालिकेत ‘पार्वती’ भूमिका साकारल्यामुळे नकळत अभिनेत्रीचं लोकांसोबत एक नातं तयार झालं. ‘महादेव’ या मालिकेमुळे चर्चेत असताना सोनारिका हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यामुळे अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला, कारण अभिनेत्रीने बिकीनीमध्ये फोटो पोस्ट केलेले. अभिनेत्रीच्या पोस्टवर, ‘असंस्कारी’ आणि ‘बेशर्म’ एवढंच नाही अनेक नेटकऱ्यांनी अश्लील कमेंट देखील केल्या.
सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगनंतर सोनारिका हिने एका पॉडकास्टमध्ये याबद्दल मोठं वक्तव्य केलं. अनेक वर्षांनंतर यावर सोनारिका म्हणाली, ‘मी बिकिनी घालेल, कोणाच्या बापाचं काय जातं… माझ्या वडिलांना आणि नवऱ्याला काही फरक पडत नाही. बिकिनी घालण्यात मला काही हरकत नाही. या गोष्टीबद्दल मला तेव्हा ट्रोल करण्यात आलं जेव्हा महादेव मालिकेनंतर मी अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं.
‘ट्रोलकरत लोकं सतत बोलायचे, पार्वती बिकिनी कशी घालू शकते. मी तर फक्त एक भूमिका साकारली होती. पण मी कोणते कपडे घालते, ते मला स्वतःला प्रेजेंट करतात. जर तुम्हाला पाण्यात जायचं आहे, तर तुम्ही बिकिनी घालून जाल, नाही की ड्रेस आणि सूट घालून तर कोणी जाणार नाही.. ‘
पुढे अभिनेत्री असं देखील म्हणाली की, ‘ट्रोल करणारी तिचं लोक असतात, जे दुसऱ्यांच्या आयुष्यावर जळतात. त्यांना असं वाटतं मी असं का काही करु शकली नाही. पार्वकी ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली त्यासाठी मी आभारी आहे… पण लोकांना देखील कळायला हवं की, मला माझं स्वतःचं खासगी आयुष्य सुद्धा आहे…’
सोनारिका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आता पती आणि मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील सोनारिका कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.