Dhanush: धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा करणाऱ्या दाम्पत्याविरोधात कायदेशीर नोटीस

| Updated on: May 22, 2022 | 9:09 AM

धनुष (Dhanush) हा आमचा मुलगा आहे असा दावा या दाम्पत्याने केला आहे. धनुषचे वकील एस. हाजा मोहिदीन गिस्थी यांनी ही नोटीस पाठवली आहे.

Dhanush: धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा करणाऱ्या दाम्पत्याविरोधात कायदेशीर नोटीस
Dhanush
Image Credit source: Facebook
Follow us on

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याचे वडील कस्तुरी राजा (Kasthoori Raja) यांनी मदुराईतील एका दाम्पत्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. धनुष हा आमचा मुलगा आहे असा दावा या दाम्पत्याने केला आहे. धनुषचे वकील एस. हाजा मोहिदीन गिस्थी यांनी ही नोटीस पाठवली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, धनुष आणि त्याच्या वडिलांनी संबंधित जोडप्याला प्रेस स्टेटमेंट जारी करण्यास सांगितलं आहे. या प्रेस स्टेटमेंटमध्ये त्यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगावं लागेल आणि असे आरोप केल्याबद्दल माफी मागावी लागेल. असं न केल्यास त्यांना 10 कोटींच्या मानहानीच्या खटल्याला (Defamation case) सामोरं जावं लागू शकतं.

“माझ्या क्लायंटने त्यांच्याविरुद्ध खोटे, बदनामीकारक आरोप करणं टाळावं असं आवाहन तुम्हा दोघांना केलं आहे. तसं न झाल्यास त्यांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कोर्टाची पायरी चढू. त्यांच्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी तुम्हा दोघांवरही मानहानीचा खटला दाखल केला जाऊ शकेल,” असं त्या नोटिशीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

मदुराई इथं राहणारे कॅथिरेसन आणि मीनाक्षी यांचं असं म्हणणं आहे की, धनुष हा त्यांचा तिसरा मुलगा आहे. चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी तो घरातून पळून गेला होता, असं त्यांनी म्हटलंय. धनुषने 2017 मध्ये ही केस जिंकली होती. मात्र या दाम्पत्याने पुन्हा एकदा हे प्रकरण उपस्थित करत पोलिस तपासाची मागणी केली आहे. धनुषने त्यावेळी कोर्टात चुकीची पॅटर्निटी टेस्ट रिपोर्ट सादर केली, असाही आरोप कॅथिरेसन यांनी केला आहे. एवढंच नाही तर या जोडप्याने दरमहा 65 हजार रुपये भरपाईची मागणी केली आहे.