Dharmendra Health : खरच धरमजी भाग्यवान, असा चाहता मिळायला नशीब लागतं, Viral VIDEO

Dharmendra Health : धर्मेंद्र लाखो लोकांच्या ह्दयावर अधिराज्य करतात. प्रत्येक जण ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहे. 89 वर्षीय धर्मेंद्र यांना बुधवारी 12 नोव्हेंबर 2025 रोजी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

Dharmendra Health : खरच धरमजी भाग्यवान, असा चाहता मिळायला नशीब लागतं, Viral VIDEO
Dharmendra Health
| Updated on: Nov 12, 2025 | 1:32 PM

Dharmendra Fan : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. धर्मेंद्र यांचे फॅन्स त्यांच्या घराबाहेर जमा होत असून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा यासाठी प्रार्थना करत आहेत. या दरम्यान धर्मेंद्र यांच्या एका फॅनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्याचा हा व्हिडिओ पाहून लोक खरोखरच हळहळले. त्यांच्या भावनांना स्पर्श झाला. व्हायरल क्लिपमध्ये धर्मेंद्र यांचा हा चाहता इमोशनल दिसतोय. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी प्रार्थना करताना दिसतो.

धर्मेंद्र यांच्या चाहत्याचा हा व्हिडिओ आता सोशल माीडियवर व्हायरल झाला आहे. लोक त्याच्या निस्वार्थ प्रेम भावनेचं कौतुक करतायत. व्हिडिओमध्ये हा चाहता धर्मेंद्र यांचं पोस्टर हातात घेऊन उभा असलेला दिसतो. त्यावर लिहिलय ‘हे देवा कृपया लवकर चांगला हो, धरमी जी’.

त्यांचे चित्रपट पाहून तो मोठा झाला

हा चाहता दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या घराबाहेर उभा असून तो वारंवार भावुक होताना दिसतो. हा फॅन लहानपणापासून धर्मेंद्र यांचा मोठा चाहता आहे. त्यांचे चित्रपट पाहून तो मोठा झाला. इतकच नाही, तो आपल्या फेवरट अभिनेत्याचं ‘सात अजूबे इस दुनिया में’ हे गाणं गाताना दिसला. गाणं गाताना तो पुन्हा इमोशनल होतो.

आज डिस्चार्ज मिळाला

लाखो लोकांच्या ह्दयावर धर्मेंद्र अधिराज्य करतात. प्रत्येक जण ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहे. 89 वर्षीय धर्मेंद्र यांना बुधवारी 12 नोव्हेंबर 2025 रोजी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांचा मुलगा सनी देओल आणि बॉबी देओलसह कुटुंबाने घरातच त्यांची काळी घेण्याचा निर्णय घेतला.


कुटुंबाने काय ठरवलं?

आता कुटुंबियांच्या देखरेखीखाली धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरु राहतील. डॉ. प्रतित समदानी यांनी पीटीआयला सांगितलं की, “धर्मेंद्र यांना सकाळी 7.30 वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. त्यांच्यावर घरीच उपचार होतील. कराण कुटुंबाने त्यांच्यावर घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला”