Dhurandhar 2: ‘धुरंधर २’ आणखी धमाकेदार होणार, चित्रपटात आदित्य धरचा आवडता अभिनेता दिसणार, नाव ऐकून उत्साह वाढेल!

Dhurandhar 2: काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता या चित्रपट एका नव्या अभिनेत्याची एण्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.

Dhurandhar 2: ‘धुरंधर २’ आणखी धमाकेदार होणार, चित्रपटात आदित्य धरचा आवडता अभिनेता दिसणार, नाव ऐकून उत्साह वाढेल!
Dhurandhar
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 21, 2026 | 4:08 PM

हिंदी चित्रपटसृष्टीमधील यशस्वी चित्रपटांच्या यादीमधील एक नाव म्हणजे धुरंधर. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाने जगभरात चांगली कमाई केली. अभिनेता रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या चित्रपटाबाबच मोठी अपडेट समोर आली आहे.

‘धुरंधर’च्या अपार यशानंतर आता आदित्य धरच्या ‘धुरंधर 2’कडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाबाबत बराच काळ चर्चा सुरू आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे की, विक्की कौशल या चित्रपटात स्पेशल अपीयरन्स (कॅमियो) देताना दिसू शकतो. अहवालांनुसार, मेजर विहान शेरगिलचे काही अॅक्शन सीनही या चित्रपटात दाखवले जाऊ शकतात. ‘धुरंधर’ पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाचे दीवाने झाले आहेत. सोशल मीडियावर लोकांनी चित्रपटावर मनापासून प्रेम व्यक्त केले आहे. आता ‘धुरंधर २’बाबतही चर्चा जोरात सुरू आहे. चित्रपटाबाबत रोज नवीन अपडेट्स येत राहतात. आता बातमी आहे की, चित्रपटात विक्की कौशल पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘उरी’शी कनेक्शन काय?

‘धुरंधर’च्या पहिल्या भागाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये रणवीर सिंहच्या पात्राचे नाव जसकीरत सिंह रांगी दाखवले गेले, त्यामुळे चित्रपटाचा कनेक्शन सतत ‘उरी’शी जोडला जात आहे. ‘उरी’ चित्रपटाच्या एका सीनमध्ये कीर्ती कुल्हारीने विक्की कौशलला तिच्या पतीचे नाव जसकीरत रांगी सांगितले होते. आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की, विक्की कौशल मेजर विहान शेरगिलच्या भूमिकेत ‘धुरंधर २’मध्ये दिसू शकतो. त्याचा रोल छोटा असला तरी कॅमियो स्वरूपातही तो दिसू शकतो.

अॅक्शन सीनमध्ये धमाल करणार?

एका रिपोर्टनुसार, आदित्य धर ‘धुरंधर २’मध्ये जी धमाल करणार आहे त्याबाबत सर्व गोष्टी गुपित ठेवण्यात आल्या आहेत. ‘उरी’ आणि ‘धुरंधर’मध्ये खूप फरक असूनही त्यांनी ‘धुरंधर युनिव्हर्स’ तयार करण्याचे ठरवले आहे. त्यांनी ‘उरी’चा ट्रॅक ‘धुरंधर’मध्ये मिसळून काही नवीन करण्याचा प्लॅन केला आहे. विक्की कौशलचा ‘उरी’ एक वॉर ड्रामा होता, ‘धुरंधर २’मध्ये विक्की कौशलचा रोल याच धर्तीवर घडवला गेला आहे. पण रणवीर सिंह आणि विक्की यांचा आमना-सामना होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. असेही म्हटले जात आहे की, विक्की कौशलने ‘धुरंधर पार्ट १’ रिलीज होण्यापूर्वीच आपल्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शिवाय, ‘धुरंधर’चे दिग्दर्शक आदित्य धर आणि विक्की कौशल यांच्यात खास बाँड आहे.