
अभिनेता संजय दत्त याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आयुष्यात अनेक संकटांचा सामना केल्यानंतर संजय दत्त याने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. सध्या अभिनेता ‘धुरंधर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या ‘धुरंधर’ सिनेमा फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील विक्रम रचत आहे. आता ‘धुरंधर’ सिनेमामुळे चर्चेत असणारा संजय एकेकाळी खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. संजूबाबाने तीन वेळा लग्न केलं. तिसऱ्या पत्नीसोबत आता अभिनेता आनंदी आयुष्य जगत आहे. तर, त्याच्या पहिल्या पत्नीचं कॅन्समुळे निधन झालं. पण अभिनेत्याच्या दुसऱ्या पत्नीबद्दल फार कोणाला माहिती नाही.
संजय दत्त यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव रिया पिल्लाई असं आहे. रिया हिचं देखील संजय याच्यासोबत दुसरं लग्न केलं. रिया हिने पहिलं लग्न मायकल वॉज याच्यासोबत केलं होतं. रिया आणि मायकल यांचं लग्न फक्त 10 वर्ष टिकलं. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 1994 मध्ये रिया आणि मायकल यांचा घटस्फोट झाला.
पहिल्या घटस्फोटानंतर रिया हिने संजूबाबा याच्यासोबत दुसरं लग्न केलं. पण विवाहित असताना, रिया हिचं टेनिस खेळाडू लिएंडर पेस याच्यासोबत प्रेमसंबंध सुरु होते. विवाहबाह्यसंबंध असल्यामुळे रिया आणि सजंय यांचा घटस्फोट झाला. पण लिएंडर याने कधीच रिया हिच्यासोबत लग्न केलं नाही. दोघे तब्बल 10 वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होते… लिएंडर आणि रिया यांना एक मुलगी देखील आहे.
पण लिएंडर आणि रिया यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही… दोघांमध्ये अनेक वाद सुरु झाले. अशात रिया हिने लिएंडर याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले. रिया पिल्लईने 2014 मध्ये लिएंडर पेसविरुद्ध खटला दाखल केला होता. तिने पेस आणि त्याच्या वडिलांवर घरगुती हिंसाचार, भावनिक आणि आर्थिक छळाचे आरोप केले होते.
आठ वर्षांनंतर, न्यायालयाने त्यांचं नातं विवाहाच्या स्वरूपाचं असल्याचा निकाल दिला.न्यायालयाने टेनिस खेळाडूला रियाला दरमहा 50 हजार रुपये भाडे आणि 1 लाख रुपये देखभालीसाठी देण्याचे आदेश दिले. याशिवाय, ही देखभाल दरवर्षी 5 टक्के दराने वाढेल..असा निर्णय कोर्टाने सुनावला…
आता रिया मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील रिया सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.