डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video

जॅस्मिन सँडलस हिचा नुकताच डेहराडूनच्या चाहत्यांसाठी एक लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान गायिकेला चुकचा स्पर्श करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

डेहराडुन येथे धुरंधर गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत... Video
jasmine sandlas
| Updated on: Jul 20, 2026 | 8:55 AM

जॅस्मिन सँडलस नाव आता संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले आहे. तिने आदित्य धर या चित्रपट ‘धुरंधर’ मध्ये गाणी गायली आहेत. तेव्हापासून जॅस्मिन हीचा प्रत्येक जण फॅन झाला आहे. गायिकेची अनेक वर्षांची मेहनत आता कुठे रंग आणत आहे. जॅस्मिन ही गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या देशाच्या कोपऱ्या जाऊन कॉन्सर्ट करीत आहे.मात्र, डेहराडुन येथे गायिकेला चाहत्यांनी चुकीचा स्पर्श केल्याचा प्रकार घडला आहे.

जॅस्मिन सँडलेस गेल्या आठवड्यात देवभूमी उत्तराखंडची राजधानी देहराडून येथे होती. तेथे तिची लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केली होती. शोमध्ये हजारोच्या संख्येने चाहते आले होते. गायिकेने आपल्या दमदार परफॉर्मेंसने येथे चाहत्यांना खूष केले. या दरम्यान एक क्षण असा आला की ज्याची कल्पना जॅस्मिन हीच्या चाहत्यांनी देखील केली नव्हती.

जॅस्मिनला चुकीचा स्पर्श केला ?

कॉन्सर्ट दरम्यान जॅस्मिन सँडलेस स्टेजच्या टोकापर्यंत पोहचली होती. तेथे तिचे अनेक चाहते गर्दीत उभे होते. ते त्यांना हातमिळवण्यासाठी तेथे गेली होती. तेव्हा काही लोकांनी तिला चुकीचा स्पर्श करायला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या काही लोकांच्या मते गायिकेला या घटनेमुळे अवघडल्या सारखे आणि अनकंफर्टेबल वाटले. व्हिडीओच्या शेवटी काही लोकांना एकमेकांशी भांडताना आणि स्टेजपासून दूर करताना पाहिले गेले. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर जॅस्मिन हीची प्रतिक्रीया आलेली नाही.

येथे व्हिडीओ पाहा –

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us