2 वेळा जेवण, 10 तास झोप..; 50 वर्षीय अक्षय खन्नाने सांगितलं फिटनेसचं रहस्य

वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेता अक्षय खन्नाने 'धुरंधर'मध्ये कमालीचं अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने त्याचा डाएट प्लॅन आणि फिटनेस रुटीन सांगितला आहे.

2 वेळा जेवण, 10 तास झोप..; 50 वर्षीय अक्षय खन्नाने सांगितलं फिटनेसचं रहस्य
Akshay Khanna
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 08, 2026 | 1:01 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अभिनेता अक्षय खन्ना प्रकाशझोतात आहे. या चित्रपटा त्याने क्रूर रेहमान डकैतची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. दमदार अभिनयासोबतच 50 वर्षीय अक्षयचं फिटनेस पाहून चाहते भारावून गेले आहेत. त्याचं फिटनेस रुटीन आणि डाएट प्लॅनविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने त्याचं रुटीन, खाण्यापिण्याच्या सवयी यांविषयी सांगितलं आहे. विशेष म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही तो त्याचं हेच रुटीन फॉलो करतो. त्याच्या डाएटमध्ये विशेष असा कोणताच बदल केला जात नाही. त्याचसोबत कोणता गोड पदार्थ आणि कोणती भाजी आवडते, याविषयीही त्याने सांगितलं आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “आजसुद्धा मी कधीच नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट करत नाही. मी थेट दुपारी पोटभर जेवण करतो आणि रात्री डिनर. लंच आणि डिनरदरम्यान मी काहीच खात नाही. सँडविच किंवा बिस्किट यांसारखे स्नॅक्ससुद्धा मी खात नाही. मी माझ्या डाएटबद्दल खूप सजग असतो. परंतु संध्याकाळचा चहा मी कधीच सोडत नाही. संध्याकाळी मी फक्त एक कप चहा पितो आणि तेवढंच मला पुरेसं असतं.”

“मी फारसं फॅन्सी असं काही खात नाही. माझं जेवण एकदम साधं आणि बॅलेन्स्ड असतं. दुपारच्या जेवणात मी डाळ-भात खातो. त्यासोबत एखादी भाजी किंवा चिकन किंवा फिश किंवा एखादी नॉन-व्हेज डिश आवर्जून असतं. रात्रीच्या जेवणात मी कोणत्याही भाजीसोबत चपाती खातो आणि एक चिकनच्या डिशचा समावेश असतो. बहुतेकवेळा माझं जेवण असंच असतं. शूटिंगच्या वेळीही माझं डाएट एकसारखंच असतं. त्यात काही बदल नसतो. पण मी 10 तास झोप पूर्ण करतो”, असं त्याने पुढे सांगितलं आहे.

अक्षय खन्नाचा आवडता पदार्थ कोणता?

या मुलाखतीत अक्षयने त्याच्या आवडीचं जेवण कोणतं, हेसुद्धा सांगितलं. अक्षयला गोड पदार्थही फार आवडतात. त्यातही केक त्याला सर्वाधिक आवडतं. याशिवाय फळांमध्ये लिची, भाज्यांमध्ये भेंडीची भाजी त्याला आवडते. अक्षयने पुढे म्हटलं की त्याला गोड पदार्थ इतके आवडतात की तो काहीही गोड खाऊ शकतो.