Dhvani Bhanushali : प्रसिद्ध गायिकेनं गुपचूप उरकला साखरपुडा, होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली, माझा आवडता कपकेक…
Dhvani Bhanushali : गायिका ध्वनी भानुशालीनं गुपचूप साखरपुडा उरकला असून होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

'दिलबर' आणि 'वास्ते' सारख्या गाण्यांनी चाहत्यांमध्ये विशेष स्थान निर्माण करणाऱ्या गायिका ध्वनी भानुशालीनं तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक नवीन सुरुवात केली आहे.
ध्वनीनं तिचा बॉयफ्रेंड यश भानुशालीसोबत साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत आणि तिच्या साखरपुड्याची अंगठीही दाखवली आहे.
ध्वनी भानुशालीनं शुक्रवारी, 13 नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर यश भानुशालीसोबतच्या तिच्या साखरपुड्याचे चार फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये, दोघं एकमेकांना मिठी मारताना आणि खूप आनंदी दिसत आहेत.
'मला माझा आवडता कपकेक मिळाला. मी हो म्हटलं.' असं कॅप्शन ध्वनीनं लिहिलं आहे. तिसऱ्या फोटोमध्येही दोघेही हसत आहेत आणि कॅमेऱ्यासाठी पोज देत आहेत.
चौथ्या आणि शेवटच्या फोटोमध्ये, गायिका तिची साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे.
ध्वनी भानुशाली आणि यश भानुशाली यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते आणि सेलिब्रिटी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाच्या सुरुवातीबद्दल अभिनंदन करत आहेत.