AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RAC तिकीट योजना संपणार ? संपूर्ण भाडे घेऊन अर्धी बर्थ देण्याचा नियम बदलणार?

RAC vs waitlisted ticket: भारतीय रेल्वे आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट प्रणालीचा आढावा घेत आहे, यात योजनेत प्रवासी पूर्ण भाडे भरूनही त्यांना अर्ध्या बर्थवर प्रवास करावा लागतो. अनेक दशके जुनी असलेली ही प्रणाली रद्द करणे किंवा तिच्या जागी नवीन प्रणाली आणण्याचा विचार सुरु आहे. जेणेकरून प्रवाशांना पूर्ण बर्थ मिळू शकतील...

RAC तिकीट योजना संपणार ? संपूर्ण भाडे घेऊन अर्धी बर्थ देण्याचा नियम बदलणार?
RAC
| Updated on: Nov 13, 2026 | 9:16 PM
Share

Train Ticket Booking Rules: ट्रेनने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना एक मोठा झटका लागू शकतो. भारतीय रेल्वे आता RAC ( reservation against cancellation) तिकीटांची योजना समाप्त करण्याच्या बेतात आहे. रेल्वे मंत्रालयाने या अनेक दशकाहून जुनी व्यवस्थेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या RAC तिकीट योजने अंतर्गत दोन प्रवाशांना एकाच साईड लोअर बर्थवर प्रवास करवा लागतो. मात्र, दोघा प्रवाशांकडून संपूर्ण बर्थचे पैसे वसुल केले जाते.

आता प्रश्न केला जात आहे जर संपूर्ण प्रवासी भाडे ( RAC ticket full fare ) त्यांच्याकडून वसुल केले जात आहे. तर त्यांना झोपण्यासाठी संपूर्ण बर्थ का मिळू नये. या असुविधा आणि भाड्याच्या व्यवस्थेला पाहूनच आता रेल्वे RAC तिकीट व्यवस्थेला संपवण्याच्या मार्गावर आहे.

संपूर्ण पैसे दिल्यानंतरही अर्धी बर्थ का?

आरएसी म्हणजे रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन (RAC ) रेल्वेची अशी योजना आहे ज्यात प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी तर मिळते, मात्र, त्याला सुरुवाताली संपूर्ण बर्थ मिळत नाही. sharing train berth ने प्रवास करावा लागतो.

सर्वसाधारण पणे दोन RAC प्रवाशांना एक साईड लोअर बर्थ दिली जाते. दिवसाचे या बर्थचा वापर बसण्यासाठी होतो. तर रात्री यात दोन्ही प्रवाशांना यावरच झोपावे लागते.

म्हणजे दोन्ही प्रवासी आप-आपल्या तिकीटाचे संपूर्ण भाडे देतात. मात्र, त्यांना वेग-वेगळी झोपण्याची जागा मिळत नाही. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला सांगितले की जेव्हा एखाद्या प्रवाशाला झोपण्यासाठी संपूर्ण जागा मिळत नाही तर त्याच्याकडून संपूर्ण भाडे घेणे योग्य नाही. यावर विचार करण्याची गरज आहे.

संसदीय समितीने केला सवाल ?

RAC तिकीटाच्या योजनेवर केवळ प्रवासी प्रश्न करीत नाहीएत तर एका संसदीय समितीने देखील या व्यवस्थेचा आढावा घेण्याची शिफारस केली आहे. समितीचे म्हणणे आहे जेव्हा RAC तिकीटधारकाला स्वतंत्र बर्थ मिळत नाही तर त्याच्याकडून कन्फर्म तिकीटाच्या एवढे भाडे का घ्यायचे ?

समितीच्या या शिफारसीनंतर रेल्वे मंत्रालयाने सध्या व्यवस्थेत बदल करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, RAC ला संपवण्याचा किंवा भाड्यात बदल करण्या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

महिला प्रवाशांची अडचण

RAC तिकीटात अनेकदा एकाच बर्थवर पुरुष आणि महिला प्रवाशांना अर्धी अर्धी जागा मिळते. यामुळे दोन्ही प्रवाशांना विचित्र स्थितीचा सामना करावा लागतो. अशा स्थिती ट्रेन तिकीट परीक्षक म्हणजे TTE समोर देखील पेच पडतो. जर ट्रेनमध्ये अन्य कोणतीही बर्थ रिकामी नसेल तर प्रवाशाची पर्यायी व्यवस्था करणे कठीण होते.

का सुरु झाली होती RAC ची व्यवस्था?

RAC व्यवस्था सुरुवातीच्या काळात सुरु झाली होती. जेव्हा रेल्वेत तिकीटांचे आरक्षण मॅन्युअल पद्धतीने होत होते. त्या काळात तिकीट कॅन्सल होणे आणि रिकाम्या बर्थचा हिशेब ठेवणे सोपे नव्हते. अशा कॅन्सलेशनमुळे रिकाम्या होणाऱ्या सीटचा चांगला वापर करणे आणि जास्त प्रवाशांना प्रवासाची संधी देण्यासाठी RAC तिकीटाची व्यवस्था केली होती.

रेल्वेत साल १९८६ मध्ये संगणीकृत आरक्षण प्रणाली (PRS) सुरु झाली. त्यामुळे तिकीट रद्द झाल्यानंतर रिकाम्या होणाऱ्या बर्थची माहिती आणि RAC प्रवाशांना कन्फर्म बर्थ देण्याची प्रक्रिया सोपी झाली. तरीही ही RAC व्यवस्था सुरु आहे.

RAC तिकीट वाल्यांना मिळणार संपूर्ण बर्थ?

सध्याच्या व्यवस्थे जर एखादा कन्फर्म तिकीटवाला प्रवासी आपले तिकीट रद्द करत असेल तर RAC प्रवाशाला रिकामी झालेली बर्थ मिळू शकते. मात्र, ही उपलब्धता केवळ कन्सलेशनवर अवलंबून आहे. आता रेल्वे समोर या व्यवस्थेला समाप्त करणे किंवा यात बदल करणे. सध्या मंत्रालय या प्रस्तावावर विचारविनिमय करत आहे. त्यामुळे प्रवाशांनो अजून तरी RAC तिकीट व्यवस्था संपलेली नाही तसेच या संदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप