AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : कर्ज कितीही असुद्या, एका झटक्यात फिटेल, फक्त करा वास्तुशास्त्रामधील हा एक सोपा उपाय

अनेकांच्या बाबतीमध्ये असं होतं की एकदा कर्ज घेतलं की ते लवकर फिटत नाही. अनेकदा कर्ज वाढतच जातं, कर्ज लवकर फिटावं, आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : कर्ज कितीही असुद्या, एका झटक्यात फिटेल, फक्त करा वास्तुशास्त्रामधील हा एक सोपा उपाय
VASTUSHTRAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 9:15 PM
Share

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या विविध समस्यांवर वास्तुशास्त्रामध्ये साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की, प्रचंड कष्ट करून देखील पैसा हातात टिकत नाही. तो कोणत्या न कोणत्या कारणांमुळे खर्च होतो. महिन्याच्या शेवटी तिजोरीमध्ये खडखडात असतो. तसेच काही जणांनी कर्ज घेतलेलं असतं, ते कर्ज फेडण्याचा खूप प्रयत्न करतात, रात्रंदिवस कष्ट करतात. परंतु त्यांना काही कर्ज फेडण्यात यश येत नाही. त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांच्या मदतीने नक्कीच तुमची सर्व अडलेली काम पूर्ण होतील, तसेच तुमच्यावर कितीही कर्ज असलं तरी ते देखील राहणार नाही, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

तांब्याच्या नाण्याचा उपाय – अनेकजण कर्ज घेतात, परंतु नतर कर्ज फेडण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. खूप प्रयत्न करून देखील लवकर कर्ज फिटत नाही, त्या मागे वेगवेगळी कारणं असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील तुम्हाला या प्रकराच्या समस्या जाणवू शकतात. कर्ज लवकर फिटावं, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, तो म्हणजे एक तांब्याचं नाणं घ्या, ताब्यांच्या नाण्यावर एक स्वस्तिकच चिन्ह काढा आणि हे नाणं कायमस्वरुपी आपल्या खिशात ठेवा. या उपायामुळे तुमच्यावरील कर्ज दूर होण्यास मदत होईल, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.

गणपती उपासना – आर्थिक प्राप्तीसाठी नित्यनियमाने गणपती उपासना करण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. दररोज नित्यनियमाने गणपती मंत्राचा जप करावा, सोबतच दररोज गणपतीला एक लाल फूल अर्पण करावं, गणपती बापाच्या कृपेनं तुमच्या घराची भरभराट होते, कर्ज दूर होतं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप