AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सर्वात मोठी बातमी, वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू, शरद पवारांच्या जवळच्या माणसाचा मोठा बॉम्ब

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सर्वात मोठी बातमी, वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू, शरद पवारांच्या जवळच्या माणसाचा मोठा बॉम्ब
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 9:00 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. अजित पवार असते तर 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं, असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता.  सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचं निश्चित झाले होतं,  पवार कुटूंब एकत्र येणं आमच्यासाठी महत्वाचं आहे, असं अभिजीत पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले? 

अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचं निश्चित झाले होते,  पवार कुटूंब एकत्र येणं आमच्यासाठी महत्वाचे आहे. राजकारणासाठी वेगवेगळं झालेलं पवार कुटूंब एकत्र आल्यास आनंदच होईल, विलीनीकरणा संदर्भात वरिष्ठ पातळीवर हालचाली होत आहेत. विलीनीकरण प्रक्रियेत आमची मते जाणून घेतील, असा मोठा दावा यावेळी अभिजीत पाटील यांनी केला आहे. दरम्यान  सुप्रिया सुळे यांची नेमकी विलिनीकरण प्रश्नी  काय भुमीका आहे?  हे त्यांची भेट घेतल्यावरच समजेल, असंही यावेळी अभिजीत पाटील यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल यांची बैठक 

दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे. संसद भवन परिसरामध्ये  जवळपास 35  मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये देखील बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या बैठकीमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप