AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratna Sadavarte : छटपुजेवरुन वातावरण तापलं, गुणरत्न सदावर्तेंचं ठाकरे बंधूना थेट चॅलेंज, म्हणाले, ‘येऊनच दाखवा….’

छटपूजेच्या विरोधकांविरोधात पोलिसांत तक्रार केल्याचंही सदावर्ते यांनी सांगितलं. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी करत त्यांनी नेमकं काय आव्हान दिलं?

Gunratna Sadavarte : छटपुजेवरुन वातावरण तापलं, गुणरत्न सदावर्तेंचं ठाकरे बंधूना थेट चॅलेंज, म्हणाले, 'येऊनच दाखवा....'
ठाकरे बंधूंना गुणरत्न सदावर्तेंचं थेट चॅलेंजImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 8:57 PM
Share

छटपूजेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे रसातळाला गेलेलं राजकारण करत असून, कधी कुंभमेळा तर कधी छटपूजेला विरोध करत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. हे बालक आहेत, यांना बालकच म्हणावं लागेल, अशा शब्दांत त्यांनी दोन्ही नेत्यांना लक्ष्य केलं. तसेच 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी होणारी छटपूजा निर्विवादपणे पार पडेल, असा दावाही त्यांनी केला.

भोजपुरी गाण्यांवरून राज ठाकरेंना सुनावलं

रेल्वेमध्ये भोजपुरी गाणी का वाजवली जातात, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरही सदावर्ते यांनी निशाणा साधला. उत्सवी गीतांना डान्स बारमधील गाणी म्हणणे ही सांस्कृतिक दिवाळखोरी असल्याचे ते म्हणाले. बिहारी म्हणून एखाद्याचा अपमान करणे हा संविधानासोबत द्रोह असल्याचेही त्यांनी सांगितले. बिहार विमानतळावर छटपूजेची गाणी वाजवली जातात, असा दाखलाही त्यांनी दिला.

‘राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी छटपूजा रोखून दाखवावी’

राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि हुसेन दलवाई यांना सदावर्ते यांनी थेट आव्हान दिले आहे. 15 तारखेला जिथे छटपूजा सुरू असेल तिथे येऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. मुंबईत छटपूजा होणारच असून, राज ठाकरे यांच्या दोन-पाच कार्यकर्त्यांमुळे पूजा थांबणार नाही, असेही ते म्हणाले. पूजेसाठी मोठ्या संख्येने लोक येतील आणि विरोध करणारे तिथून पळून जातील, असा दावाही त्यांनी केला.

राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत तक्रार

छटपूजेला विरोध करणाऱ्यांविरोधात आपण पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. छटपूजा हा हिंदू सण असून, या पूजेच्या आड येणाऱ्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, कलकत्ता न्यायालयाने छटपूजेला परवानगी दिल्याचा उल्लेख करत महाराष्ट्र सरकारनेही पूजेला परवानगी द्यावी, अशी विनंती सदावर्ते यांनी केली. ‘काश्मीर ते कन्याकुमारी हा एकच देश आहे. हा पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही’, असे म्हणत त्यांनी देशातील सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य असल्याचे सांगितले.

‘राज ठाकरे यांनी आता एखादी ग्रामपंचायतीची निवडणूक पाहावी. छटपूजा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही’, अशा शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप