AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये इतकी मोठी चूक, चौथ्या शतकातील ‘ब्रह्मकलश’ गाण्यात असं काय दिसलं?

Kantara Chapter 1: 'कांतारा चॅप्टर 1' ही चूक तुमच्या लक्षात आली का? 600 कोटी कमाई केलेल्या सिनेमात इतकी मोठी चूक, 'ब्रह्मकलाश' गाण्यात असं काय दिसलं? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

'कांतारा चॅप्टर 1' मध्ये इतकी मोठी चूक, चौथ्या शतकातील 'ब्रह्मकलश' गाण्यात असं काय दिसलं?
फाईल फोटो
| Updated on: Oct 13, 2025 | 8:57 AM
Share

Kantara Chapter 1: दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर ‘कांतारा चॅप्टर 2’ सिनेमा सध्या अनेक विक्रम रचताना दिसत आहे. सिनेमाने आतापर्यंत 600 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे, सिनेमातील एक सीन तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिग्दर्शकाकडून मोठी चूक झाली आहे. ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर सीनमधील एक स्क्रीन शॉट देखील व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र सिनेमातील त्या एका चुकीची चर्चा रंगली आहे.

‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये अखेर काय झालाय ब्लंडर?

सध्या सोशल मीडियावर जो स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, तो ‘ब्रह्मकलश’ गाण्यातील आहे. गाण्यातील एका सीनमध्ये लोकं जेवताना दिसत आहे. सर्वकाही परफेक्ट असताना, तेथे पाण्याची प्लास्टीकची बॉटल हटवण्यास दिग्दर्शक विसरला. गाण्यातील 20 लिटरच्या प्लास्टीकच्या बॉटलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सर्वांना ही गोष्ट खटकली आहे आहे, सिनेमाची कशा चौथ्या शतका भोवती फिरताना दिसत आहे. तेव्हा कदंब राजवंशाचे तिथे राज्य होते.

त्यावेळी प्लास्टिक अस्तित्वात देखील नव्हतं. सिनेमातील सीन लोकांना 2019 च्या “गेम ऑफ थ्रोन्स” वेब सिरीजची आठवण करून देत आहे. ज्यामध्ये स्टारबक्सच्या कॉफीचा कप आला होता. ‘कंतारा चॅप्टर 1’ मधील सीन लोक ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधील चूक म्हणूनही पाहत आहेत.

फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त गाण्यातील 20 लिटरच्या प्लास्टीकच्या बॉटलची चर्चा सुरु आहे. फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणालास ‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये एक किरकोळ सातत्य त्रुटी लक्षात आली. एका दृश्यात प्लास्टिकची पाण्याची बाटली दिसते. ती काढून टाकली तर बरं होईल…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ही चूक पाहून खूप वाईट वाटतं, कारण सिनेमात खूप काळजी आणि बारकाव्यांकडे लक्ष दिलं गेलं आहे.’

‘कंतारा चॅप्टर 1’ सिनेमाची कमाई

2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कांतार चॅप्टर 1’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने 11 दिवसात भारतात जवळपास 440 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात सिनेमाने 600 कोटींचा आकडा ओलांडलेला आहे. सिनेमात ऋषभ शेट्टी याच्यासोबत रुक्मणि वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?