हेमा मालिनी की पहिली पत्नी कोणासोबत राहतात धर्मेंद्र? बॉबी देओलने सांगितलं मोठं सत्य
Dharmendra: पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न, आता कोणत्या पत्नीसोबत आणि कुठे राहतात धर्मेंद्र? बॉबी देओलने सांगितलं मोठं सत्य..., धर्मेंद्र कायम खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

Dharmendra: बॉलिवूडचे ‘हीमॅन’ धर्मेंद्र कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेकांना धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना चार मुलं देखील आहे. पण बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना धर्मेंद्र यांच्या आयुष्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांची एन्ट्री झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. ज्यामुळे कुटुंबात अनेक वाद देखील झाले. दरम्यान, अभिनेता बॉबी देओल याने खुलासा केला आहे की, धर्मेंद्र त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत राहतात की हेमा मालिनी यांच्यासोबत.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, ‘माझे वडील माझ्या आईसोबत खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये राहतात. त्यांना फार्महाऊसमध्ये राहायला आवडतं. आता त्यांचं वय झालं आहे, त्यामुळे फार्महाऊस त्यांच्यासाठी लाभदायक आहे… तेथील वातावरण चांगलं आहे, पदार्थ चांगले आहेत… वडिलांनी तेथे स्वतःचं स्वर्ग तयार केलं आहे.’
बॉबी पुढे म्हणाला, ‘माझे वडील प्रचंड भावूक आहेत. कधीकधी भावनात्मक विचार करतात, तेव्हा मी त्यांना विचारतो असं लिहिलं आहे किंवा असं का म्हणाले. यावर ते म्हणतात, काही नाही मनातील भावना व्यक्त केल्या… त्यांना माहिती देखील नसतं त्यांची पोस्ट किती लोकांनी वाचली आहे… बाबा फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे स्टार झाले…’ असं देखील बॉबी म्हणाला.
आईबद्दल बॉबी म्हणाला, ‘माझी आई एक गृहिणी आहे आणि मी तिचा सर्वात लाडका मुलगा आहे. आम्ही रोज फोनवर बोलतो… आज तिने मला दोन वेळा फोन केला आहे. ती माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची महिला आहे… माझ्या आई – वडिलांमुळे मी आज स्टार झालो आहे…’
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचं लग्न…
धर्मेंद्र यांनी वयाच्या 19 व्या वर्षी पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत केलं. त्यांच्या दोन मुलांची नावं सनी आणि बॉबी अशी असून मुलींची नावं विजेता आणि अजीता अशी आहेत. धर्मेंद्र यांनी लग्न झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि काही वर्षात हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला.
