अश्लीलतेला मान्यता मिळते आणि…, पुरुषांच्या वाईट मानसिक स्थितीबद्दल जावेद अख्तरांचं मोठं वक्तव्य
सिनेमांमधील अश्लीलता आणि पुरुषांच्या वाईट मानसिक स्थितीबद्दल लोकप्रिय संगीतकार जावेद अख्तर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र जावेद अख्तर यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे...

लोकप्रिय संगीतकार जावेद अख्तर कायम स्वतःच्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. जावेद अख्तर फक्त बॉलिवूडबद्दल बोलत नाही तर, देशात सुरु असणाऱ्या अन्य मुद्द्यांवर देखील स्पष्ट मत मांडतात. आता देखील त्यांनी सिनेमांमधील अश्लीलता आणि पुरुषांच्या वाईट मानसिक स्थितीबद्दल मोठं वक्तव्य केलंय. सांगायचं झालं तर, जावेद यांनी अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘कुछ कुछ होता है’ सिनेमावर गाणं लिहिण्यास नकार दिला. कारण त्यांना सिनेमाचं शिर्षक अश्लील वाटलं…
जावेद यांनी अनंतरंग मानसिक आरोग्य सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत म्हणाले, ‘या देशातील कटू सत्य हे आहे की अश्लीलतेला चित्रपट नियामक संस्था मान्यता देतात. त्यांना हे माहित नाही की ते चुकीचे आहे. सिनेमांमध्ये पुरुषवादी दृष्टीकोन आहे, ज्यामुळे महिलांना अपमानित होतं आणि ते असंवेदनशिल असतं. अशा सिनेमांना मंजूरी मिळते. जे सिनेमे समाजातील सत्य परिस्थिती सांगतात अशा सिनेमांना मान्यता मिळण्यास उशिर होतो… अशा सिनेमांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो…’
असे सिनेमे हीट होतात कारण पुरुषांची मानसिक स्थिती अशी असते.
‘सिनेमा समाजाची खिडकी खोलणारं एक माध्यम आहे. ज्यातून तुम्ही पाहू शकता आणि खिडकी बंद करु शकता… पण खिडकी बंद केल्यामुळे सर्वकाही ठिक होणार नाही, जे समाजात सुरु आहे. पुरुषांच्या मानसिकतेभोवती फिरणाऱ्या सिनेमांना दुजोरा दुसरं तिसरं कोणी नाही तर, फक्त प्रेक्षक देतात. वाईट सिनेमांमध्ये प्रेक्षकांना रस असतो. पुरुषांची मानसिक स्थिती अशी असल्याने असे सिनेमे बनवले जात आहेत.’
जावेद यांनी पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल प्रश्न उपस्थित केले
‘पुरुषांचं मानसिक आरोग्य ठिक झाल्यानंतर असे सिनेमे तयार होणार नाहीत. बनले तरी असे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतील… सिनेविश्वात प्रेक्षक देव आहे. ते वाईट प्रेक्षक असतात, जे वाईट सिनेमांना हीट करतात.’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले.
एवढंच नाही तर, जावेद अख्तर यांनी अनेक सिनेमांना नकार दिला. जावेद यांनी स्पष्ट केलं की 80 च्या दशकात असे अनेक सिनेमे बनवले जात होते जे अश्लील होते. लोकांनी अशाच पद्धतीने गाणी देखील लिहिली. यामुळे जावेद यांनी अनेक सिनेमे नाकारले. त्यांनी शेवटचं करण जोहरच्या सिद्धांत चतुर्वेदी अभिनीत “युद्ध” सिनेमासाठी गाणी लिहिली.
